‘दि बा पाटीलः एक चळवळ' स्पर्धा आयोजक पोहेचले पनवेल नगरीत

कामोठे येथील शाळेत ‘दिबां'चा जयघोष

नवी मुंबई : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते, क्रांतिपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य विविध स्पर्धांच्या माध्यमातून सर्व समाजाला कळावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘दि बा पाटीलः एक चळवळ' या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी स्पर्धो आयोजक ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या पदाधिकाऱ्यांनी कामोठे येथील ‘रयत शिक्षण संस्था'च्या लोकनेते दि. बा. पाटील हायस्कुलला भेट दिली.

 यावेळी ‘स्पर्धा समिती'चे संयोजक कवी, साहित्यिक, नाटककार गजआनन म्हात्रे, ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'चे सदस्य तथा ‘२९ गाव संघर्ष समिती-नवी मुंबई'चे अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष प्रताप पाटील, ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे प्रवक्ते शैलेश घाग, आदिंनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना दि. बा. चळवळ स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. यावेळी ‘हायस्कुल'चे प्राचार्य सुरेश चाळके यांनी ‘समिती'चे स्वागत घेतले. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याच्या गौरवार्थ आयोजित सदर स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. कामोठे येथील शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी सदर स्पर्धेत सहभागी होतील, असे शाळेतर्फे आयोजकांना आश्वासित करण्यात आले.

‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष दशरथ भगत  यांनी पनवेल, उरण आणि नवी मुंबईतील विद्यार्थी, शिक्षक, ‘दिबा' प्रेमींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. भूमीपुत्र, शेतकरी, कामगार, कष्टकरी समाजाचे स्फुर्तीस्थान दि. बा. पाटील यांचे कार्यकर्तृत्व संपूर्ण जगाला कळावे, या उद्देशाने ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या वतीने ‘दि बा पाटीलः एक चळवळ' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८८५०३१५७९५/९८२११९६५७५/ ९००४३२९४५७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रवक्ते शैलेश घाग यांनी केले आहे.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

उरण तालुक्यातील बळीराम पाटील यांची  शिक्षक पुरस्कारासाठी निवड