पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम

पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

पनवेल : आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनेते दि.बा पाटील शाळेमध्ये डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिक्षण विभाग प्रमुख किर्ती महाजन , शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा डोमरे, सर्व शिक्षकवर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस .शिक्षण क्षेत्रातील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्याचा जन्मदिवस हा संपुर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. महापालिकेच्या 10 शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. शाळेतील विद्यार्थी आज शिक्षक बनले होते. शिक्षकांप्रमाणे वेशभुषा करून त्यांनी विविध विषय विद्यार्थ्यांना शिकवले. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आनंद लुटला.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘दि बा पाटीलः एक चळवळ' स्पर्धा आयोजक पोहेचले पनवेल नगरीत