नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शहरातील सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना

नवी मुंबईतील खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांकरीता महत्वाच्या मार्गदर्शक सुचनांचे दिनांक ०४/०९/२०२३ रोजी परीपत्रक

वाशी : विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना मार्गदर्शन सूचना आखून दिल्या असून तसे परिपत्रक काढले आहे.मात्र हे परिपत्रक फक्त कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी शिक्षण विभागाने केंद्र प्रमुखांमार्फत करावी अशी मागणी  नवी मुंबई पालक संघर्ष कृती समितीचे मुख्य समन्वयक विकास सोरटे यांनी केली आहे.

 नवी मुंबईतील खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांकरीता महत्वाच्या मार्गदर्शक सुचनांचे दिनांक ०४/०९/२०२३ रोजी परीपत्रक काढण्यात आले आहे . यासाठी पालक ,पालक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी  पाठपुरावा केला होता. परंतु सदर परीपत्रकाची अंमलबजावणी होणे ही तीतकेच महत्वाचे आहे. त्यामुळे शहरातील  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील शिक्षण विभागाच्या केंद्र प्रमुखामार्फत  सदर परीपत्रकानुसार शाळा प्रशासन योग्यती दक्षता बाळगुण परीपत्राकातील सुचनांचे पालन चोखपणै करत आहे का नाही त्याबद्दल पुढील १५ दिवसात अथवा महीनाभरात नवी मुंबईतील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील हद्दीतील सर्व शाळांमध्ये पाहणी दौराकरुन प्रत्येक शाळेचा सदर परीपत्रकानुसार अहवाल बनवुन  त्यावर सदर शाळेच्या मुख्याध्यापक व PTA मधील पालक प्रतिनिधिंच्या सह्या घेऊन सदर अहवाल  आयुक्त व शिक्षणाधिकारी यांना सादर  करण्यात यावा व अहवालानुसार जर एखादी शाळा जर योग्य अंमलबजावणी करत नसेल तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी व तसेच सदर अहवाल प्राप्त झाल्यास तो नवी मुंबईकरांसाठी प्रसिध्द करावा अशी मागणी नवी मुंबई पालक संघर्ष कृती समितीचे मुख्य समन्वयक विकास सोरटे यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

 १. शाळेच्या गेट वर प्रत्येक वर्गात तसेच प्रत्येक माळ्यांवर CCTV असावेत.

२. प्रत्येक वर्गात, शौचालयास बसण्याच्या ठिकाणी, प्रयोग शाळेत,SOS व्यवस्था / अलार्म सिस्टिम असावी जेणे करुन संकटाच्या वेळी हा अलार्म वाजवून विद्यार्थ्यास तात्काळ मदत मिळेल.

३. प्रत्येक शाळेत आरोग्य कक्ष असावे, त्यात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे जेणे करुन विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी काहीही समस्या आली तर ह्या कक्षात प्रशिक्षित व्यक्तीच्या निरीक्षणाखाली ठेवता यावे, जेणे 9 करुन विद्यार्थ्यांना तात्काळ योग्य उपचार मिळतील.

४. विद्यार्थ्याच्या आरोग्याविषयक काही समस्या असल्यास पालकांस त्वरीत फोन करुन शाळेत बोलवावे.

५. शौचालयास बाहेरुन कड़ी ऐवजी मॅग्नेटिक लॉक सिस्टिम असावेत. तसेच CWSN (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी कमोड खुर्ची असावेत.

६. शाळेत RAMP असावेत.

७. शाळेतील व्हरांड्यात "Fire Extinguisher" असावे.

८. प्रत्येक शिक्षक हा अग्निशमक/रोधक साधने हाताळण्यास प्रशिक्षित असावा.

९. प्रत्येक शाळेचे दरवर्षी (इलेक्ट्रिकल आणी शाळेतील सुविधा) यांचे ऑडिट झाले पाहिजे.

१०. प्रत्येक शाळेत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था असावी.

११. पालकांनी केलेल्या तक्रारीची वेळीच योग्य दखल घेण्यात यावी.

१२. पावसाळ्यामध्ये पाण्यामुळे शाळेच्या भोवती किंवा मैदानात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संरक्षणासाठी शेड बांधाण्यात यावीत.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम