सानपाडा मधील विवेकानंद संकुल शाळेचा उपक्रम

शालेय विद्यार्थिनींकडून अग्निशमन जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

नवी मुंबई : सानपाडा येथील विवेकानंद संकुल  शाळेच्या विद्यार्थिनींनी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन साजरा केला. विवेकानंद शाळेच्या विद्यार्थिनींनी वाशी अग्निशमन केंद्रातील अग्निशमन अधिकारी आणि जवानांना राख्या बांधल्या. यावेळी बांधण्यात आलेल्या राखीमुळे अग्निशमन दलाचे जवान देखील भारावून गेले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून सानपाडा, सेक्टर-४ येथील ‘छत्रपती शिक्षण मंडळ'च्या विवेकानंद संकुलातील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी एक धागा देशभक्तीचा, देशासाठी काहीही, एक धागा मानवतेच्या सर्वांप्रती प्रेमभाव जपण्याचा... असा संदेश देत वाशी येथील अग्निशमन केंद्रातील अधिकारी आणि जवानांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधन साजरे केले. यावेळी विद्यालयातील शिक्षकवर्ग, अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

६ महिला शिक्षिका आणि ९ पुरुष शिक्षक यांचे अन्नत्याग आंदोलन