वीर वाजेकर कॉलेज, उरण येथे न्हावा शेवा वाहतूक शाखेचे व. पोलीस निरीक्षक जी एम मुजावर यांची भेट

शाळेच्या जीवनात मूला मुलींना कायद्याची माहिती असणे गरजेचे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर 

उरण : एक महिला सुशिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते.अशा आदर्शवत महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सध्या बदलत चालला आहे. तरी अशा महिला वर्गाना शाळेच्या जीवनातच कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कॉलेज, उरण या ठिकाणी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर यांनी भेट देऊन विद्यार्थी व शिक्षक यांच्यासोबत वाहतूक सुरक्षा व वाहतुकीचे नियम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित विद्यार्थी मूला मुलींना भारतातील महिलांना संरक्षण देणारे कायदे, सायबर क्राइम म्हणजे काय याची ही सविस्तर माहिती करून दिली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य पी.जी. पवार, उपप्राचार्य श्री महाले, प्राध्यापक अमोल ठक्कर तसेच इतर प्राध्यापक, शिक्षक व सुमारे ६० ते ७० विद्यार्थी उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

सानपाडा मधील विवेकानंद संकुल शाळेचा उपक्रम