२.५ लाख विद्यार्थ्यांनी जागविला मातृभूमी, वीरांविषयीचा अभिमान

 ‘मेरी माटी, मेरा देश' अभियानमध्ये ४३२ शाळांतील विद्यार्थ्यांना एकाच वेळी सहभाग

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘माझी माती, माझा देश' अर्थात ‘मेरी माटी, मेरा देश' या अभियानांतर्गत ९ ऑगस्ट रोजी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भव्यतम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यानंतर सदर ‘अभियान'च्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या आणि खाजगी ४३२ शाळांमध्ये एकाच वेळी २ लाख ४५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या ५ हजारहुन अधिक शिक्षकांनी विविध उपक्रमांत सहभागी होत ‘राष्ट्रीय एकात्मता'चे दर्शन घडविले.  

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार, नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व शाळा व्यवस्थापनांच्या बैठका घेऊन त्यांना अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या सूचना करण्यात आल्या होता. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी महापालिका आणि सर्व बोर्डाच्या ४३२ शाळांमध्ये २ लाख ४५ हजार १५१ विद्यार्थ्यांनी मातृभूमीविषयीचे प्रेम आणि मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांबद्दलचा अभिमान व्यक्त केला.

या अंतर्गत वसुधा वंदन, वीरांना वंदन तसेच पंचप्रण शपथ ग्रहण आणि ध्वजारोहण, राष्ट्रगान असे विविध कार्यक्रम शाळा-शाळांमधून संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी माती हातात घेऊन, तिरंगा झेंडा हातात घेऊन आणि काही ठिकाणी वृक्षारोपण करुन त्या क्षणाचे सेल्फी आणि फोटो काढून शासनाच्या प्ूूज्ेः//सीग्स्ीीूग्सीी्‌ोप्.ुदन्.ग्ह या वेबपोर्टलवर अपलोड केले. वेबपोर्टलवर फोटो अपलोड करुन शपथ घेतल्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रे प्राप्त करुन घेतली.

इको सिटी, क्लीन सिटी, ट्‌वेन्टी फर्स्ट सेन्चुरी सिटी अशा विविध नावांनी नावाजले जाणारे नवी मुंबई शहर सुशिक्षितांचे शहर आणि एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जात आहे. अशा नवी मुंबई नामक ज्ञाननगरीतील ४३२ शाळांतील २.५ लाखाहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी ‘मेरी माटी, मेरा देश' अभियानात एकाच वेळी घेतलेला सहभाग नवी मुंबईकरांचे मातृभूमीविषयाचे प्रेम आणि वीरांविषयीचा मनात असलेला अतीव अभिमान व्यक्त करणारे आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

प्रा. मेघना मेहेंदळे यांचा ‘ज्ञानसाधना'च्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञ सन्मान