ठाणे महानगरपालिकेकडून ठाण्यातील  विद्यार्थ्यांचा सन्मान

शालांत परीक्षेत भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ठाण्यातील  विद्यार्थ्यांचा ठाणे महानगरपालिकेकडून सन्मान

 ठाणे  : शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये भाषा विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी महापौर अशोक वैती उपायुक्त उमेश बिरारी, उमाकांत गायकवाड, शंकर पाटोळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सरस्वती सेकंडरी स्कूलचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

 यावेळी संस्कृत विषयात 100 गुण प्राप्त करणाऱ्या ओम पणशीकर, निधी रहाटे, सात्यकी मुळये, भूमी भोजने (सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा), अनिका करंदीकर (सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज), अमृता बापट, विराज गोगटे, धानवी देशमुख, रुचिर दामले (ए.के.जोशी इंग्लीश मिडीयम स्कूल, ठाणे) तर इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी निधी रहाटे गुण - 95 (सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा),  मराठी (हायर लेवल) या विषयात श्रावणी सावळकर – गुण 96, (सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा),सार्थक जाधव  गुण 96 (बाल विद्यामंदिर, किसननगर नं. 2), गुजराथी विषयात ट्विंकल सुतार – गुण 92 (टि. जे. स्कूल), हिंदी हायर लेवल या विषयात मानसी शुक्ला – गुण 91 (अश्ररुी देवी हिंदी हायस्कूल, रामचंद्र नगर 1) सिंधी हायर लेवल मध्ये शिजा रियाजुद्दीन शेख – गुण 95 (शोएब उर्दु हायस्कूल, मुंब्रा) तर विशेष मुलांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या अनशारी रिझवान अनवर हुसेन या विद्यार्थ्यांला देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्यावतीने रु 2,000/- चा धनादेश, सन्माचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना क्रूझ क्षेत्राबद्दल मार्गदर्शन