महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना क्रूझ क्षेत्राबद्दल मार्गदर्शन
भारती विद्यापीठ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना क्रुझ क्षेत्राबद्दल मार्गदर्शन
नवी मुंबई : भारती विद्यापीठच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझम स्टडीज विभागातर्फे ‘क्रुझ लाईन क्षेत्रातील करिअरच्या संधी' या विषयावर गेस्ट लेक्चरचे आयोजन नुकताच करण्यात आले होते. यावेळी क्रुझ लाईन क्षेत्रात कार्यरत असणारे इंडस्ट्री प्रोफेशनल गणेश बंगेरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संवाद सत्रात क्रुझ क्षेत्राबद्दल असलेल्या अनेक शंकांचे निरसन केले. सदर लेवचरला हॉस्पिटॅलिटी विभागाचे १५० विद्यार्थी उपस्थित होते. भारती विद्यापीठ हॉस्पिटॅलिटी स्टडीज विभागाचे प्रा. रोहन शिवेकर यांच्या सहकार्याने या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
भारती विद्यापीठाच्या हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझम स्टडीज विभागातर्फे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उपल्बध असलेल्या संधींची माहिती मिळावी यासाठी नेहमीच अनेकविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. यावेळी आयोजित सत्रात इंडस्ट्री प्रोफेशनल मार्गदर्शक गणेश बंगेरा यांनी क्रुझ क्षेत्र म्हणजे काय? क्रुझ लाईन कोणी, का आणि कशी जॉईन करावी? यासाठी लागणारी पात्रता काय आहे? देश-विदेशात नोकरीच्या उपलब्ध असलेल्या संधी आणि एकंदरीतच क्रुझ क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. तसेच क्रुझ जहाजावर असलेले विविध विभाग यामध्ये रेस्टॉरेंट, किचन, फुड अँड बेव्हरेज, हाऊसकिपींग, फुड प्रोडक्शन, बारटेंडींग, सर्व्हिस यासह इतर अनेक विभागांची देखील माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांना क्रुझ क्षेत्राबद्दल असलेले गैरसमज दूर करत त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, यश मिळायला कधी कधी उशीर होतो; पण मिळतो नक्कीच. तुमचे लक्ष, यश प्राप्त होत नसेल किंवा विलंब होत असेल तर त्यासाठी असणारे रस्ते बदला; परंतु लक्ष बदलू नका. अतिशय माहितीपर असे सदर सेशन संपन्न झाले, असे मार्गदर्शक गणेश बंगेरा म्हणाले.