अपरिचीत शिवराय : महाराज यांचे जगातील शत्रू

महाराज यांचे जगातील शत्रू

     शिवराय हे तेच ते पवित्र असे तिर्थ आहे, ज्याचा मतितार्थ हा सर्वार्थाने फक्त हे राज्य श्रींचे व्हावें हाच खरा यथार्थ स्वार्थ आहे. शिवनेरीवर जन्म झाला म्हणून शिव; तर रायगडावर देह ठेवला म्हणून, राय हे बिरूद आपल्या नावातच जीवन प्रवासात ठेवणारे छत्रपती हे एकमेव असे स्वराज्य दैवत आहेत, की ज्यांना शत्रू होता तो देखील घरापासून तर दारापर्यंत असणारा. या बलाढ्य शत्रूसोबत त्यांना दोन हात करावे लागलेत, त्या सर्वांना चारीमुंड्या चीत करणे हे अग्निदिव्य महाराज हे करतात, ते देखील स्वकीय शत्रू पाठीवर असताना, महाराज यांनी छातीवर घ्ोतलेत ते परकीय महादुश्मन देखील..

     महाराज यांच्यासोबत ज्यांनी, ज्यांनी पंगा घ्ोतला त्या प्रत्येक माणसास राजास त्यांनी त्यांचा इंगा दाखवला, त्याला नंगा करून..., श्रीरंगा, पांडुरंगा काय असते ते राजे दर्शवतात. महाराज यांना ज्यांना, कुणास अंगावर तर कधी काहींना शिंगावर घ्यावे लागले. त्यात युसुफ आदिलशहा, हा आदिलशाहीचा संस्थापक होता. तो तुर्कस्थान ह्या देशामधील! हाच तो आदिलशहा ज्याने शहाजीराजे यांना बेड्या ठोकण्याचा हुकूम दिला, त्याच आदिलशहाला महाराज यांनी अफजल खानसारखा त्याचा मोहरा प्रताप गडावर बळी देऊन जो झटका आणि फटका दिला, तो तुर्की आदिलशहा नंतर सावरलाच नाही. महाराज यांचा पुढील प्रतिस्पर्धी होता कूली कुतुब. हा कुतुबशाहीचा संस्थापक, जो होता इराण हया देशाचा. हाच कतुबशहा नंतर शेपटी टाकून, वाकवून गोवळकोंड्याचा रस्त्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी रांगोळ्या आणि दारावर गुढ्या उभारत होता. हे फार मातब्बर असे राजे, मजबूत आपले पाय जमीनीत गाडून उभे झाले होते. मात्र त्यांचेदेखील इमले हे खाली आणण्याचे काम शिवराय करतात, हा आजही लोकास अचंबा वाटतो.

     इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे देखील पुणे किंवा नगर, साताऱ्याहून नव्हते आले, ते आले होते ते म्हणजे युरोप हया खंडातून.  यांनादेखील महाराज माना झुकवून, वाकायला भाग पाडतात. त्यांच्याकडून व्यापार, शस्त्र साठी, ज्ञान घ्ोऊन, फायदा घ्ोऊन ..आपल्या अटीनुसार त्यांना वागायला भाग पाडतात, हे मला वाटतं जगातलं पहिलं नवल असावे. सिद्दी देखील जंजीरा हया ठिकाणी समुद्रात पाय टेकून उभे होते तरी, त्यांनादेखील, समुद्राबाहेर महाराज यांनी कधीच बाहेर पडू दिले नाही. महाराज प्रत्येकास त्यांची जागा दाखवून, शिस्तीत राहण्याचा शिरस्ता पाळण्यास भाग पाडतात. पठाण असलेला दिलेरखान पठाण हा अफगाणिस्तानमधून आलेला प्ी्या होता. मात्र त्याला देखील ताकदीपेक्षा मन, मेंदु आणि मनगट यांची सांगड घालून बुद्धिबळात महाराज त्यास घराचा रस्ता दाखवतात आणि जिंकत राहिल्यामुळे..मीच खरा  प्रजाहित दक्ष राजा हे ठासून सांगतात.

         कारतलबखान हा उझबेक्स्तिान मधून आलेला, म्हणजेच रशियाजवळील एक सेनापती ! त्यास देखील लोहगड विसापूर किल्ल्याजवळ असलेल्या उंबरखिंडीमध्ये रायबाघन ह्या, स्त्री सेनानी समोर युद्ध म्हणजे काय तर..., कमी पैशात, कमीत कमी वेळात अपेक्षित विजय मिळवून विजयाचा हुंकार फोडणे, हा पायंडा पाडला. आज उंबरखिडीत झालेली लढाई ही फक्त चढाई न राहता..विजय कसा संपादन केला जातो, त्याचा एक वस्तुपाठ झाला आहे. एकूणच औरंगझेब ते स्वकीय शत्रू जोखत असताना, आपण यांना मोजत नसून, मोजड्यात घालून फिरतोय, हा दरारा महाराज यांनी निर्माण केला होता.

     ६ जून १६७४ रोजी राजे झालेले महाराज.. वयाचे ४४व्या वर्षी छत्रपती होतात, मात्र राज्य कारभार कसा चालवावा यासाठी त्यांना, त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी जी राजमुद्रा धारण केली होती, तो देखील एक मोठा अनुभव राजे यांना राजेपद मिळवता..कामी येत होता.

      एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांना भावकी,  गावकी आणि राव की हे घरभेदी शत्रू होतेच, त्याहीपेक्षा परक्या देशातील, परक्या भाषा असणाऱ्या सेनापतीसमोर सह्याद्रीचा छावा कसा पंजा मारतो, तेदेखील आपणास लक्षात येते.  -रवींद्र ऊ. पाटील, कोपरखैरणे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आत्महत्या ही सुटका नव्हे !