लेख संपदा : देश कि बेटीयाँ सुरक्षित आहेत का ?

देश कि बेटीयाँ सुरक्षित आहेत का ?

स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी हे शब्द स्त्रीच्या बाबतीत समर्पक असून स्त्री ही देवता का असेना तिला नेहेमीच स्वतःच्या तिला नेहमीच अस्तित्वाची लढाई लढावी लागली.तिला अनेक अग्निपरीक्षांमधून जावे लागते, घाव सोसावे लागतात.मुलींना शरीरानेच नाही,  तर मनानेही खंबीर बनवायला हवे. तिचे कुटुंब ती कुठेही राहिली तरी तिच्या पाठीशी सदैव राहील हा विश्वास तिच्या मनात निर्माण केला पाहिजे. ज्यांना मुलगे आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांना मुलींचा आदर करायला शिकवले पाहिजे.
पहिल्यापासूनच स्त्रीला सहजसुलभ असं काही नव्हतंच. प्रत्येक वेळी तिला स्वतःला सिद्ध करावं लागलं. सीतामातेला स्वतः  देवतास्वरूप असूनही कठोर अशा अग्निपरीक्षेतून जावे लागले. पाच पांडव पती असूनही पांचालीला वस्त्रहरणाला सामोरे जावे लागले. अहिल्येचा दोष नसतानाही गौतम ऋषींच्या क्रोधाला सामोरे जाऊन शिळा होऊन पडावे लागले. पहिल्यापासून स्त्रीला आदिशक्तीच्या रूपात पुजले जात असे. परंतु तिच्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी तिला झगडावे लागे.
अनिष्ट रूढी, परंपरापूर्वीच्या काळी पतीच्या निधनानंतर सती, केशवपन अशा क्रूर प्रथांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नसे. बालवयात जरी वैधव्य आलं तरी आजन्म त्यांना तसेच राहावे लागे. विधवा होणे हा स्त्रीचा गुन्हा मानला जात असे. १८५६ मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा आला त्यानंतर विधवांनाही समाजात मनाचे स्थान मिळू लागले.
पूर्वीच्या काळाची अजून एक वाईट प्रथा म्हणजे हुंडा. घरात येणाऱ्या नववधूला गृहलक्ष्मी मानले जाते. तिच्या पावलांनी घरात ऐश्वर्य येते असे म्हणतात. परंतु वराकडचे लोक या वाक्याचा विपरीत अर्थ घ्ोऊन वधूच्या घरच्यांकडे अवास्तव मागण्या करत असत. त्यामुळे वधूच्या घरच्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत, घरे गहाण ठेऊन मुलाकडच्यांच्या मागण्या पुऱ्या कराव्या लागत. त्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी व्हावे लागायचे. परंतु सर्वच वधुपित्यांना ते शक्य नसायचे. त्याचमुळे पूर्वीच्या काळी मुलगी जन्माला आली म्हणजे तिला मात्यापित्याच्या शिरावरचा भार समजायचे. हुंडा देणे आणि घ्ोणे ही परंपरेने अस्तित्वात असलेली एक अनिष्ट प्रथा आहे. पूर्वीच्या काळीही या हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून अनेक स्त्रियांनी मृत्यूला जवळ केले. ज्या स्त्रियांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्यांना आपले संसार, मुलेबाळे यांना गमवावे लागले, अशा स्त्रियांना समाजही स्वीकारत नसे. या प्रथेवर वचक बसावा म्हणून सरकारने १९६१साली हुंडा प्रतिबंधक कायदा तयार केला आहे. तरीही आज अनेक स्त्रिया या प्रथेला बळी पडतच आहेत. वर्षानुवर्षे हा आकडा वाढतच आहे. भारतात आजही दार तासाला एक हुंडाबळी जातो आहे. हुंडा घ्ोणारे कायद्यालाही जुमानत नाहीत.
स्त्री भ्रूणहत्या
हुंडा प्रथेबरोबरच अजूनही एक वाईट गोष्ट म्हणजे स्त्री भ्रूणहत्या. आजच्या काळातही मुलींचे गर्भ पाडले जातात. काही वर्षांपूर्वी यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अतिशय घटले होते. मनुष्य कितीही मोठा झाला तरी तो निसर्गापुढे लहानच असतो. तो सोयीस्करपणे विसरतो की निसर्ग, मुली आणि मुलगे जन्माला घालून आपला समतोल साधत असतो. जर आपण स्त्री भ्रूणहत्या केली तर उद्या आपल्या मुलाला पत्नी मिळेल का? आपल्याला जन्म देणारी एक स्त्रीच होती, आपल्या मुलाला जन्म देणारी पत्नीही एक स्त्रीच आहे, यागोष्टी ते सोयीस्करपणे विसरतात. यात फक्त पुरुषच नाही, तर अनेक स्त्रियाही सामान भागीदार असतात. स्वतः स्त्री असून आपल्या मुलीला, नातीला जन्माला येऊन देत नाहीत. याविरुद्ध अनेक आवाज उठवले गेले. या प्रकाराला मोठ्या प्रमाणात आळाही बसला. तरीही असे प्रकार आपल्या समाजात होतात हे ऐकुनच मन सुन्न होतं. १९०१ साली ९७२ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती. २००१ साली ९३३ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती. महाराष्ट्रातील सहा वर्षांच्या खालील मुलींचे प्रमाण सन २००१ मध्ये ९१३ असे होते. मात्र २०११च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ८८३ इतके म्हणजे जवळ जवळ ३० टवव्ोÀ खाली उतरले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी शासनामार्फत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र - लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४आणि सुधारित कायदा २००३ उपलब्ध आहेत. शासन आपल्या परीने प्रयत्न करतच आहे; परंतु आपणही आपली मानसिकता बदलली पाहिजे. निसर्गानेनेच स्त्रीला शरीराने नाजूक, परंतु मनाने कणखर बनवले आहेत. आजच्या मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत. फक्त मुलगा वंश पुढे नेतो म्हणून मुलगाच हवा ही मानसिकता बदलायला हवी. कारण त्या मुलाला जन्म देणारीसुद्धा एक मुलगी असते. हे लक्षात घ्यायला हवे.
सामाजिक हिंसाचार
आजकाल स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहेत. पायलट, रेल्वे चालक, रिक्षाचालक, बस चालक, अग्निशामक दल, आर्मी अशा हमखास पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. इतकेच काय, पण शवविच्छेदनासारख्या कठीण आणि कठोर कामातही आता स्त्रिया अग्रेसर होत आहेत. भारत आता महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातल्या मुली प्रगती करत आहेत. जगभरात ‘भारतकी बेटी नाव कमवत आहे. ऑलिम्पिक मेडल आणून भारताची मन उंच करत आहे, तर गगनभरारी घ्ोऊन सगळ्या जगाला आपल्यापुढे झुकवत आहे. क्रिकेट हा फक्त मुलांचाच प्रांत नाही, हे आपल्या मुलींच्या टीमने सिद्ध केलं आहे. कुस्ती, नेमबाजीसारख्या मर्दानी खेळातही मुली अग्रेसर आहेत. तरीही देशातल्या मुली आजही सुरक्षित नाहीत. त्यांना अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलींवरच्या अत्याचारांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मुलींवर अत्याचार करून त्यांना निर्घृणपणे ठार मारले जात आहे. त्यांच्या मृतदेहाची क्रूरपणे विल्हेवाट लावली जात आहे. एकूणच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खरे तर, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशातमहिलांवर अत्याचार होतच आहेत. या घटना कधी प्रकाशात येतात, तर कधी येत नाहीत. सध्याच्या काळातली हादरवून टाकणारी घटना म्हणजे वसईतील श्रद्धा वालकर या मुलीची आफताब पूनावाला या मुस्लीम इसमाने दिल्लीत नेऊन निर्घृण हत्या केली आणि तिच्या पार्र्थिवाचे ३५ तुकडे करून ते घरातल्याच फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज थोडे थोडे तुकडे बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट तो लावत होता. हे ऐकूनच जीव हादरून गेला.आजकालची युवा पिढी लग्न संस्थेला मानत नाही. त्यांचा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याकडे कल असतो. मुली शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब राहतात. त्यांना बंधनमुक्त स्वतंत्र आयुष्य जगायची सवय लागलेली असते. आईवडिलांचे विचार त्यांना जुनाट वाटतात. आपल्या आयुष्याचा मुक्त मार्ग स्वतःच्या जबाबदारीवर त्या निवडतात. आपल्याला आवडलेल्या मुलाबरोबर त्या राहतात. आपल्या समाजातअजूनही लीव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नाही. अशा संबंधांना कायद्याचेही संरक्षण नाही. त्यामुळे लीव्ह इनमध्ये जर संबंध बिघडले तर एकट्या मुलीला त्रास होतो. तिला कुठलेच कायदेशीर आणि सामाजिक संरक्षण नसते. संबंध बिघडल्यावर एक तर अशा हत्या होतात किंवा मुलींना आत्महत्येला प्रवृत्त केले जाते.
नुकतीच मीरा रोड येथे अशाच प्रकारची घटना घडली. एका इसमाने त्याच्या लीव्ह इन पार्टनरची हत्या केली आणि अतिशय निर्घृण पद्धतीने तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली. त्यानेही अतिशय किळसवाणा प्रकार केला. तिच्या मृत शरीराचे ३५ तुकडे केले, ते कुकरमध्ये शिजवले, नंतर मिक्सरमध्ये बारीक केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. काही तुकडे संडासात टाकले. काही कुत्र्यांना खायला घातले. हे ऐकूनही अंगावर सरसरून काटा येतो. नुकत्याच झालेल्या मणिपूर येथील घटनेने संपूर्ण भारत हादरून गेला आहे. त्यामुळे खरंच मुली, स्त्रिया भारतात सुरक्षित आहेत का हा विचार करण्याची बाब आहे. अनेकदा मुलींनी प्रेमाला किंवा शारीरिक संबंधांना नकार दिल्यास त्यांच्यावर ॲसिड हल्ले, किंवा त्यांची निर्घृण हत्या, बलात्कार असे प्रकार सरसकट होत असतात. याउलट एखाद्या मुलाने प्रेमात फसवल्यामुळे नैराश्यातून मुली आत्महत्या करताना दिसतात. असे फक्त मध्यमवर्गीय किंवा आर्थिकदृष्टया आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातच होते असे नाही तर उच्च वर्गात मोठ्या पदावर काम करणाऱ्या, चित्रपट, लहान पडद्यांवर काम करणाऱ्या मुलींच्या बाबतीतही शारीरिक शोषण, विनयभंग असे प्रकार होतानादिसतात. इतकंच काय नोकरी, शिक्षणानिमित्त प्रवास करणाऱ्या मुलींना येताजाता किळसवाण्या स्पर्शांनासामोरे जावे लागते.
कितीतरी मुली याबाबत घाबरून गप्प बसतात. सहन करत राहतात. नोकरी टिकवणे, सामाजिक प्रतिष्ठा अशा वेष्टनाखाली आपल्या व्यथा लपवतात. अगदीच सहन झाले नाही तर तर आत्महत्येचा पर्याय जवळ करतात, तर काहीजणी मानसिक आजारांनी ग्रस्त होतात. आजच्या काळातले हे विदारक सत्य आहे. मग यावर उपाय काय? देश कि बेटार्ी कायम या भीतीच्या जोखडातच राहणार का ? देश कि बेटीयाँ फक्त भाषणापुरत्याच राहणार का ? त्या कधीच मोकळा श्वास घ्ोऊ शकणार नाहीत का ? यावर उत्तर आपल्यालाच शोधायचं आहे. आजकाल मुलींच्या सुरक्षिततेसाठी अनेक ॲप आले आहेत जे वापरून मुलींना तातडीची पोलिसांची मदत मिळते. अनेक शाळा, कॉलेजांमधून स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. मुलींना शिक्षणात सवलती मिळत आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये, सरकारी खात्यात मुलींसाठी राखीव जागा असतात. रेल्वेमध्ये खासकरून रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पोलीस तैनात असतात. पण आपणही नागरिक म्हणून, पालक म्हणून आपली जबाबदारी उचलायला हवी. मुलींना शरीरानेच नाही,  तर मनानेही खंबीर बनवायला हवे. तिचे कुटुंब ती कुठेही राहिली तरी तिच्या पाठीशी सदैव राहील हा विश्वास तिच्या मनात निर्माण केला पाहिजे. ज्यांना मुलगे आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांना मुलींचा आदर करायला शिकवले पाहिजे. जर एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल तर तिला मदत केली पाहिजे ही शिकवण पालकांनी मुलांना दिली पाहिजे. आई, बहीण, पत्नी, कन्या या नात्यांबरोबरच मैत्रीण हेसुद्धा शुद्ध नाते असते हे मुलांना समजावले पाहिजे. असे झाले तर देश की बेटीयाँ ही कल्पना भाषणापुरतीच न राहता, सत्त्यात उतरून आपल्या देशाची मान नक्कीच उंचावेल यात शंकाच नाही. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं...
हम देश कि बेटीयाँ
हम भारत कि शान
ऊँची उडान भरके यश की
बढाएंगे देश का सामान
-संपदा देशपांडे, पनवेल, जि. रायगड. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : साराच दोष पावसाचा नसतो!