दोघे जिंकू या

कोण शोषक कोण शोषित ? दै. आपलं नवे शहर या वर्तमानपत्रातील मुशाफिरी लेखमालेमधील लेख वाचनात आला. ब्रेकअप झाल्यावर फक्त मुलींवरच अन्याय झाला असतो का? असं नसतं. मुलांवरपण झालेला असतो. जी हळवी व्यक्ती, नात्यातली अधिक गुंतलेली असते, तिला जास्ती त्रास होत असतो. कधी कधी डोकं संमतीने ठरवतात, चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ! पण तो काळ पण आता पन्नास वर्षांपूर्वीचा झाला. हल्ली ब्रेकपनंतर, हिंसेवरच उतरतात. तरीही समजूतदारपणे एकमेकांपासून दूर झालेले जोडपे, त्यांची ही एक वेगळी कविता आपण नमुन्या दाखल बघायला हरकत नाही.
या समजूतदारपणा विषयी एक कविता.
प्रिये दिसे तो कोट्याधीश जेट वाला,
ईथे वळून बघतेस तू आता कशाला ?
क्षणभरात संपवलेस नाते दशकाचे,
लोकांनी गॉसिप केले आपल्या ब्रेकपचे !१!!
किती राजे तुझ्या जीवनी आले गेले असतील,
पण तू एकटीच राणी, माझ्या मनातील!
तू अतृप्त, तू तृषार्त महत्वाकांक्षिणी
मी तृप्त, तरी आर्त, व्यस्त सुलक्षणी!!२!!
फुले बक्षीसे, हीरे, घर पॉश, भारी कपडे ,
सर्व दिले तुला. पण तुला वाटले तोकडे !
नाते संपवण्याचे कारण, तुला कंटाळा आला,
माझ्या जीवनाचा मात्र, पोर खेळ झाला.!!३!!
फार टोचल्या लोकांच्या, टोकेरी नजरा
न स्पर्शणारे दैवी हात, दुखावणारा शेरा !
त्या सर्वाहून आत्म्यास दुखावून गेले,
प्यारी तुझे मला सोडून जाणे असले!!४!!
शिवाय त्याचे ते कारण खोटे सांगितलेले
की माझे वय आहे फार मोठे झाले
आत्मा तर तोच आहे ना सखे ग आत ,
दुर्गुण, निर्गुण थोडे वाढले आहेत सात !!५!!
शरीर देत नाही आता धावपळीत साथ
मन घालते गोंधळ, असणे नसणे विचारात!
उदास विरही मृत्यूमय एकटेपणी राहण्यात,
नाही रमत मन माझे ,या अशा जगण्यात!!६!!
तुझे मन उडाले, मला विश्लेषणात कळले,
प्रश्नोत्तरा विचारात सत्य काय आता उरले?
तुझे मन विटले, ते जुने नाते सरले !
मग माझ्या मनी अवशेष का उरले?!!७!!
पापणीचे केस,पूजा, आशा, तुटलेले तारे,
नको शकूनी आकांक्षा, स्वप्न आता पुरे,
प्रिये पहा खुषीत राहा, नवीन स्वप्नाकडे,
जगू या आपण सुखाने, तू तिकडे मी इकडे!!८!!
यु विल विन, आय विल अल्सो बीन. आय विल नॉट लूज. हम होंगे कामयाब ! आम्ही जिंकणार आहोत.
एकमेकांच्या विरोधी आमच्या शक्ति वापरण्याऐवजी आम्ही वेगळ्या वाटेने जाऊ. तू सुखी राहा, मीही
सुखी राहीन. दोघे जीवनातील लढाईत जिंकू या.
प्रिये, आपण दोघंही वाईट नव्हतो, पण आपल्या आंतर प्रतिक्रिया सुखद झाल्या नाहीत. त्यामुळे आपला
ब्रेकअप झाला आहे. तू तुझी सुखी मनाप्रमाणे जगत रहा, मी माझ्या जीवनात सुखी राहायचा प्रयत्न
करीन.
दोघे जिंकू या.
 

-शुभांगी पासेबंद. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी ; केवळ आहार नव्हे, मदतकार्यही ‘समतोल' असावे !