जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
महापालिकेच्या शाळांमध्ये अवतरली पंढरी
पनवेल महापालिकेच्या शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विविध शाळांमध्ये दिंडीचे आयोजन
पनवेल : महापालिकेच्या शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिनांक 28 जून , 29 जून, 30 जून या तीन दिवसांमध्ये विविध शाळांमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या दहा शाळांनी खास वारकरी , विठ्ठल -रूखमाईची वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांसहीत आपआपल्या शाळा परिसरात दिंडीचे आयोजन केले होते. सर्व शाळांमध्ये विठू नामाचा गजर होताना दिसला.
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच आपल्या परंपरांची माहिती व्हावी या हेतूने शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन सर्व शाळांमध्ये करण्यात आले होते. यावेळी विठ्ठलाची पालखी सोबत काढलेल्या दिंडीमध्ये सर्व मुले टाळ मृदुंगाच्या गजरात ,अभंगामध्ये दंगून गेली होती. या दिंडींमध्ये मुलांनी पारंपारिक खेळाचे प्रात्यक्षिक केले.
डोक्यावरती तुळस घेऊन लहान वारकऱ्यांनी काढलेल्या या दिंडीतील विद्यार्थ्यांचे आयुक्त गणेश देशमुख यांनी कौतुक केले. शिक्षण विभागाच्या अधिक्षक किर्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी आषाढी एकादशी निमित्ताने आपआपल्या शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विठ्ठलाच्या नामघोषात दिंडी काढली.