गरीब, गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत

‘श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट'तर्फे २० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे धनादेश वाटप

नवी मुंबई : श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट, नेरुळ तर्फे गरीब, गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीचे धनादेशाचे ३० जून रोजी वाटप करण्यात आले.  नवी मुंबई महापालिका माध्यमिक विद्यालय  क्रमांक-१०१, शिरवणे येथे संपन्न झालेल्या सदर धनादेश वाटपाप्रसंगी ‘श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट'चे अध्यक्ष राधाकृष्णन, त्यांच्या पत्नी सौ. ललिता, शिरवणे शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सदर कार्यक्रमात एकूण २० विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ‘ट्रस्ट'ने एकूण ३०० विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. ‘ट्रस्ट'चे एकूण १० ठिकाणी शिक्षागण आहेत. ज्यामध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे एकूण ३७०  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच संस्था टेलरींग, ब्युटीशियन, मेहंदी, एम.एस.ऑफिस, ऑटो ड्रायव्हिंग यासारखे व्यावसायिक प्रशिक्षण देते.

याशिवाय ‘ट्रस्ट'तर्फे गरीबांना वितरीत करण्यात येते. पावसाळ्यामध्ये ताडपत्री आणि घरे बांधण्यासाठी साहित्य पुरविते. गेल्या वर्षापासून ‘श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट'ने एकूण ९४ विधवा, निराधार महिलांना प्रत्येकी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

केबीपी कॉलेजला मुंबई विद्यापीठाचा अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा