माझ्या यशात नवी मुंबई शहराचा मोठा वाटा -जेमिमा रॉड्रिवस

‘पावसाळी क्रिकेट प्रशिक्षण'चा जेमिमा रॉड्रिक्सच्या हस्ते शुभारंभ

नवी मुंबई ः घणसोली येथील ‘पीपीसीए क्रिकेट अकादमी'ने पावसाळी क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. भारताची धडाकेबाज महिला फलंदाज जेमिमा रॉड्रिक्स हिच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संदीप नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

‘पीपीसीए क्रिकेट अकादमी'मध्ये विविध वयोगटातील खेळाडू क्रिकेटचे प्रशिक्षण घ्ोत आहेत. पावसाळ्यात क्रिकेट खेळाडुंची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने या ठिकाणी सरावासाठी इनडोअर प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी अंध महिला क्रिकेट संघाची खेळाडू गंगा कदम, ‘अंध महिला क्रिकेट संघ'चे सचिव पंकज चौधरी तसेच ‘मुंबई महिला क्रिकेट संघ'ची कर्णधार प्रकाशिका नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  
या कार्यक्रमाला सहायक पोलिस आयुक्त भागवत सोनावणे, महापालिकेचे क्रिडा अधिकारी रेवपपा गुरव, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी सुभाष काकडे,माजी नगरसेवक केशव म्हात्रे, जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक कामत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अकादमीचे व्यवस्थापक वामन चव्हाण, मुख्य प्रशिक्षक अजय सिंघम, सचिन सुर्यवशी यांचाही सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे संदीप नाईक यांनी अंध महिला क्रिकेटपट्टू गंगा कदम हिला एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. जेमिमा रॉड्रिक्स ही आता नवी मुंबईकर झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील मुलींना चांगले मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक विकास साटम यांनी केलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.

माझ्या यशात नवी मुंबई शहराचा मोठा वाटा आहे. त्यामुळे नवी मुंबईविषयी मला विशेष प्रेम आहे. या शहरातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी शक्य तितके योगदान देण्यास आपण तयार असल्याचे जेमिमा रॉड्रिक्स हिने यावेळी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियातील ‘मेलबर्न स्टार्स स्पोर्टस्‌ फाऊंडेशन'च्या वतीने भारतातील विविध क्रिकेट क्लबसाठी मेलबोर्न स्टार्सने गणवेश देऊ केले आहेत. यावेळी जेमिमाच्या हस्ते उपस्थित खेळाडुंना गणवेशाचे वाटप करण्यात आले. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

नवी मुंबईकर प्रकाशिका नाईकचा भारताच्या महिला क्रिकेट संघात समावेश