महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
धुतूम प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
उरण : २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त उरण तालुवयातील धुतूम येथील प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना ‘भारतीय जनता पार्टी'च्या जासई महिला विभाग अध्यक्ष सौ. शमिता दत्ता ठाकूर यांच्या तर्फे खाऊ वाटप करुन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी सरपंच धनाजी शेठ ठाकूर, माजी सरपंच सौ. रेश्मा शरद ठाकूर, माजी उपसरपंच शरद ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष करुणा संजय घरत, ज्येष्ठ नेते अनिल शेठ ठाकूर, दिलीप ठाकूर, प्रभाकर ठाकूर, सदानंद त्रिंबक ठाकूर, करण ठाकूर, एकनाथ ठाकूर, दत्ता ठाकूर, विकास ठाकूर, मथुरा दिलीप ठाकूर, प्रशिध्दा सुनील ठाकूर, रेखा विकास ठाकूर, प्रतीक्षा निवास ठाकूर, प्रमिला सुधीर ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक मोकाशी, शिक्षक संतोष म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी योगासने, प्राणायाम करुन योगाचे महत्व समजावले.