महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
एनडीए परीक्षामध्ये तृतीय क्रमांक संपादन केलेल्या जुई ढगे हिचा विशेष गौरव
‘श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा सत्कार
नवी मुंबई : नवी मुंबई मधील ‘श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने दहावी, बारावी आणि त्यावरील सर्व पदवी परीक्षांमध्ये ८० % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशातील महत्वाच्या अशा एनडीए परीक्षामध्ये तृतीय क्रमांक संपादन करुन प्रशिक्षणासाठी नियुवती झालेली पुणे येथील जुई राजेंद्र ढगे हिचा १
लाख रुपये देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
वाशी, सेवटर-२९ मधील संस्थेच्या कार्यालय येथे झालेल्या सदर गुणवंतविद्यार्थी सत्कार सोहळ्याप्रसंगी ‘श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्ट'चे संस्थापक-अध्यक्ष रामदास डोके, माजी नगरसेवक विक्रम (राजू) शिंदे, वुÀंडलिक चौधरी, जुई ढगे हिचे वडील राजेंद्र ढगे, आई मनिषा ढगे, डीवायएसपी सुरेश जाधव, डी. के. माळी, शारदा डोके, डॉ. ठोकणे, श्रीराम डोके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सत्कार समारंभात जुई ढगे हिने आपले विचार मांडले. मला ‘श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे जो पुरस्कार दिला आहे, त्याचा वापर मी सामाजिक कार्यासाठी करेन. देशातील एनडीए परीक्षा पास होणारी पुणे जिल्ह्यातील मी एकमेव मुलगी ठरली आहे. मुलींनी या क्षेत्रात देखील यावे. एनडीए करुन मुलींनी देशसेवा करावी. १२ वी झालेल्या मुलांना सरकारमध्ये क्लास वन ऑफिसर व्हायची संधी एनडीए देते, असे मत जुई ढगे हिने व्यक्त केले.
केंद्र सरकारने २०२१ मध्ये मुलींसाठी एनडीए मध्ये जागा उपलब्ध केल्या जातील, असे जाहीर केले होते. ते ऐकून आनंद वाटला. मात्र, अवघ्या १९ जागा ठेवण्यात आल्या होत्या. एनडीए परीक्षेचा अभ्यास करताना ती परीक्षा खूप कठीण असल्याचे जाणवले. मात्र, सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास काहीही अशक्य नाही. या परीक्षेचा निकाल अवघा ०.००१ % लागतो. एनडीएन परीक्षेमध्ये देशात तिसरी आली असून इंटरव्ह्यूमध्ये मला सर्वाधिक मार्क्स मिळाल्याचे जुई हिने सांगितले. मुली या क्षेत्रात येत आल्याचे पाहून आनंद होतोय, आणखी मुलींनी देशसेवेसाठी यावे, असे आवाहन देखील तिने यावेळी केले. विशेष म्हणजे जुई ढगे नॅशनल आर्चरी चॅम्पियन देखील आहे.
दरम्यान, यावेळी जुईचे वडील राजेंद्र ढगे आणि आई मनीषा ढगे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले.