महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
modi@9 महा-जनसंपर्क-अभियान
गुणांचे उंच मनोरे रचणे एवढीच आजच्या शिक्षणाची संकुचित व्याख्या -आ.मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : देशभरात ‘भारतीय जनता पार्टी'च्या वतीने modi@9 ‘महा-जनसंपर्क-अभियान' अंतर्गत विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे.याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्फत सीबीडी मधील पिपल्स एज्युकेशन महाविद्यालयातील हुशार गुणवंत आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम २० जून रोजी पंजाब हॅरिटेज भवन येथे संपन्न झाला.
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'तर्फे बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागला असून इतिहासात आत्तापर्यंतचा सर्वात जास्त निकाल अशी ख्याती यंदाच्या निकालाला लाभली आहे. मुलांच्या आणि शाळांच्या टक्केवारीच्या आकड्यांचा उच्चांग चांगलाच डोळ्यात भरत आहे. ७५ ते ८० टक्क्यांच्या श्रेणीमधील हुशार मुलांची सद्दी आणि गुणवत्ता यादी संपून ९० % च्या श्रेणीत पोहोचलेली हुशार मुलांची पिढी नजरेस पडत आहे. आजच्या पिढी समोर शिक्षणातून गुणवत्ता मिळवणे नव्हे तर गुणांचे उंच उंच मनोरे रचणे एवढीच काय ती शिक्षणाची संकुचित व्याख्या झाली आहे. त्यामुळेच प्रत्येक इयत्तेत असलेला प्रत्येक विषय त्याच्या मूळ संकल्पनेसह समजावून घेणे आणि त्या विषयाचे सखोल ज्ञान अंतर्मनात गिरवून ठेवणे पूर्वीची अध्ययनाची पध्दत पाल्य-पालक आणि शिक्षक यापैकी कोणालाच अभिप्रेत नाही, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
पूर्वीच्या अध्ययनाच्या पध्दतीमुळे शाळेत घ्ोतलेले ज्ञान प्रत्येक इयत्तेनुसार घट्ट बिंबले जायचे आणि नंतरच्या आयुष्यातही ते उपयोगी पडायचे. पाढे, धडे, कविता, सणावळ्या, प्रदेश, नद्या, श्लोक, विज्ञानाचे सूत्र, गणिताचे सूत्र शाळा शिकून संपल्यानंतरही आयुष्यभर तोंडीपाठ असायचे. आज या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थांनी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय यासारख्या उच्चस्तरीय पदव्या प्राप्त केल्या असून मोठ-मोठ्या वेतनाची किंवा शासकीय नोकरी मिळवून आयुष्यात स्थिरस्थावर झाले आहेत, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.
याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई यांच्या समवेत ‘पंजाब असोसिएशन'चे चेअरमन गुरुबक्ष सिंग, कमल शर्मा, बिर्लाजी, माजी नगरसेवक अशोक गुरुखे, डॉ. जयाजी नाथ, निलेश म्हात्रे, संजय ओबेरॉय, नानजी भाई, ‘पिपल्स एज्युकेशन महाविद्यालय'चे मुख्याध्यापक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे तसेच शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
नवी मुंबईतील महाविद्यालयांच्या मागणी नुसार माझ्या विकास आमदार निधी मधून विविध साहित्यांचे वाटप होत असते. तसेच पिपल्स एज्युकेशन महाविद्यालयाला यापूर्वी माझ्या आमदार निधी मधून संगणक आणि प्रिंटरचे वाटप केले आहे. आज या महाविद्यालयातील इयत्ता बारावीमध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन आणि गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करुन त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.