दत्ता मेघे वर्ल्ड ऍकेडमीमध्ये मिळणार इएलएमएचे शिक्षण

ऐरोलीतील दत्ता मेघे वर्ल्ड ऍकेडमीमध्ये मिळणार ऑस्ट्रेलियातील इएलएमएचे शिक्षण

नवी मुंबई : सामाजिक आणि भावनिक साक्षरता (एसइएल) आणि माइंडफुलनेस कौशल्यांना प्रोत्साहन देणारे ऑस्ट्रेलियातील इएलएमएचे शिक्षण देण्यासाठी ऐरोलीतील दत्ता मेघे वर्ल्ड ऍकेडमीने पुढाकार घेतला आहे. मंगळवारी दत्ता मेघे वर्ल्ड ऍकेडमीमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमात ऑस्ट्रेलिया सरकारचे प्रतिनिधी व त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत याबाबतचा एक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अर्जुन मेघे, विश्वस्त शमा मेघे, ऑस्ट्रेलियातील नामवंत संसद सदस्य कॅसी रो, डेव्हिड हनी व इतर मान्यवर उपस्थित होते.  

ऑस्ट्रेलियातील इएलएमए शिक्षण हे मुलांसाठी सांस्कृतिकदृष्टÎा विशिष्ट सामाजिक आणि भावनिक शिक्षण साधनांमध्ये जगात अग्रणी मानले जाते. सामाजिक आणि भावनिक साक्षरता (एस इ एल) आणि माइंडफुलनेस कौशल्यांना प्रोत्साहन देणारा चार ते नऊ वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांसाठी इएलएमएचा हा अभिनव उपक्रम आहे. एसइएलची कौशल्ये लवकर विकसित करणारी मुले त्यांच्या भावनांचे नियमन करण्यास, तणावाचे व्यवस्थापन करण्यास, सकारात्मक नातेसंबंध निर्माण करण्यास आणि शाळा आणि जीवनात यशस्वी होण्यास सक्षम असतात.  

त्यामुळे इएलएमएचे शिक्षण आपल्या मुलांना मिळावे यासाठी ऐरोलीतील दत्ता मेघे वर्ल्ड ऍकॅडमीने ऑस्ट्रेलियासोबत भावनिक साक्षरतेवर एक सामंजस्य करार केला आहे. दत्ता मेघे वर्ल्ड ऍकॅडमीच्या विश्वस्त शमा मेघे यांनी सुरु केलेला हा उपक्रम शालेय शिक्षणातील पहिलाच उपक्रम आहे. मंगळवारी ऐरोली येथील शाळेमध्ये हा कार्यक्रम कार्यक्रमात संपन्न झाला. दत्ता मेघे वर्ल्ड ऍकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱया मुलांना भावनिक साक्षरता हे एक महत्त्वाचे कौशल्य मिळावे यासाठी हा अभिनव उप्रकम राबविण्यात येत असल्याचे राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव अर्जुन मेघे यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा पाया मजबूत होण्यास तसेच भविष्यातील कल्याण आणि यशासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  

यावेळी मिस्टर मार्टिन यांनी दत्ता मेघे वर्ल्ड ऍकॅडमीमध्ये आयोजित केलेल्या पायलट प्रोजेक्टमधील उदाहरणे देत विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासात इएमएलए उपक्रमाच्या योगदानाबद्दल माहिती दिली.राधिकाबाई मेघे स्मृती शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कु.शमा मेघे यांनी हा पथदर्शी प्रकल्प मुलांच्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणेल असे यावेळी  सांगितले. तर दत्ता मेघे वर्ल्ड ऍकॅडमीचे प्राचार्य राजीव कुमार गर्ग यांनी विशेषत: लहान वयात मुलांमध्ये भावनिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील शिष्टमंडळात संसद सदस्य कॅसी रो, डेव्हिड हनी, व्यापार आयुक्त नाशिद चौधरी, संचालक रॉबिन रॉब, ब्रॅड जॉयली, रुत्विक पुंगलिया, रोशन परेरा, अँटोनी जोसेफ आदि ऑस्ट्रेलिया सरकारमधील विविध क्षेत्रातील सदस्य तथा संचालक उपस्थित होते. त्याचप्रमाणे विश्वस्त पुष्पा मेघे आणि माजी नगरसेवक एम.के.मढवी माजी नगरसेविका विनया मढवी, राधिकाबाई मेघे विद्यालय मराठी माध्यमाचे माजी विद्यार्थी मिलिंद कुमार देखील यावेळी उपस्थित होते.  

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पनवेलकर सियाच्या तिक्ष्ण बुध्दीमत्तेचे सर्वत्र कौतुक