करिअर मार्गदर्शनपर शिबिराचा घेतला ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी लाभ

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरास चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : श्री संत सावता माळी मंडळ - ऐरोली, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वागळे व केशव मित्र मंडळ यांच्या संयुवत विद्यमाने ४ जून रोजी १० वी, १२ वी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबीर श्री संत सावता भवनाच्या परिसरात आयोजित करण्यात आले होते. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावरील हे मार्गदर्शनपर शिबिर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. यानिमित्त सुमारेे ४०० मुला मुलींनी शिबिरात नोंदणी करुन उदंड प्रतिसाद दिला.

निरनिराळ्या विषयातील तज्ञांनी मुलांना मोलाचे असे मार्गदर्शन करतानाच इयत्ता दहावी आणि बारावीनंतर करिअर संबंधी काय काय संधी उपलब्ध आहेत याबद्दल त्यांनी मुलांना सविस्तर माहिती सांगितली. मुलामुलींनी शालेय माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच स्वतःचा उद्योग निर्माण करून इतरांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असे सांगितले. प्रमुख मार्गदर्शकांमध्ये पाटणे सर यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. आनंद गांगण सर यांनी दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या संधींची माहिती यावेळी दिली. साहिल मुल्ला यांनी स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून कर्ज कसे मिळू शकते,  उद्योग कसा सुरू करू शकतो त्याचा तपशील दिला. तर रवींद्र घोडके यांनी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमास  माजी आमदार संदीप नाईक, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, समाजसेविका सौ वानखेडे मॅडम, श्री पडते, समाजसेवक रविंद्र औटी वागळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी, श्री संत सावता माळी मंडळाचे व केशव मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वितेसाठी संत सावतामाळी मंडळाचे पदाधिकारी मारुती बनकर, रोहित भुजबळ, किसन नाईक, मयूर चव्हाण, अजय व श्रीमती पाटोळे मावशी यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी संजीव फुलमाळी, गोपीचंद साबळे, हरिश्चंद्र भुजबळ, कृष्ण तांबे, राजेंद्र फुलसुंदर, शंकर डोके, राहुल वाणी, संपत जाधव, चव्हाण सर, बाळासाहेब ढोपे, संतोष ना.शिंदे, महादेव शिंदे, संतोष स. शिंदे, वितीन भास्कर, शैलेश वासनकर, दत्तात्रय चौरे, सुहास झोरे, शीतल शिंदे हेही उपस्थित होते 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

दत्ता मेघे वर्ल्ड ऍकेडमीमध्ये मिळणार इएलएमएचे शिक्षण