रबाले येथील गायत्रीदेवी योगी महापालिका शाळांमध्ये सर्वप्रथम

महापालिका शाळांचा दहावी निकाल ९१.९६ %

नवी मुंबई ः मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या २१ माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल ९१.९६ टक्के लागला आहे. महापालिका माध्यमिक शाळा क्रमांक १०४, रबाले (हिंदी माध्यम) येथील विद्यार्थिनी गायत्रीदेवी मनोजकुमार योगी ९३.८० टक्के गुण संपादन करुन महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारी विद्यार्थिनी ठरली आहे.

शाळा क्र. १०६, सेक्टर-५, कोपरखैरणे येथील विद्यार्थिनी तनुजा पोपट पाटील आणि माध्यमिक शाळा क्र.१०४ रबाले (हिंदी माध्यम) येथील विद्यार्थी पवनकुमार उमाशंकर यादव ९३.४० टक्के गुण संपादन करुन महापालिका शाळांमध्ये संयुक्तपणे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच नितू लालचंद यादव (शाळा क्र.१०४-रबाले हिंदी माध्यम) आणि भाग्यश्री अशोक सावंत (शाळा क्र.१०६, कोपरखैरणे) या दोघीही ९३.२० टक्के गुण प्राप्त करुन संयुक्तपणे तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत.

दरम्यान, इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तम गुण संपादन करुन नवी मुंबई महापालिकेच्या लौकीकात भर घालणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे.

सन २००६-०७ या शैक्षणिक वर्षापासून न्महापालिकेच्या माध्यमिक शाळांतून विद्यार्थी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा देत असून प्रत्येक वर्षी निकालाची गुणवत्ता उंचावताना दिसत आहे. यावर्षी महापालिकेच्या २१ शाळांमधून २५७५ विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेला बसले असून ९१.९६ टक्के इतका महापालिका शाळांचा सरासरी निकाल लागला आहे. त्यामध्ये नवी मुंबई महापालिका माध्यमिक विद्यालय क्र.१११ तुर्भे स्टोअर आणि शाळा क्र.११७ दिवाळे या शालांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. त्याचप्रमाणे श्रमिकनगर ९७.६७ %, पावणेगांव ९६.६१ %, कातकरीपाडा रबाले ९६.१० %, सानपाडा ९६ %, दिघा ९५.१६ %,  कोपरखैरणे सेवटर-७ ९५ %, कुकशेत ९४.६४ %, दिवा  ९४.५० %, तुर्भेगांव ९३.५१ %, महापे ९२.८५ %, ऐरोली ९१.९१ %, घणसोली ९०.३३ %, कोपरखैरणे  सेवटर-५ ९० %, करावे ८९.२४ %, शिरवणे ८९.०८ %, नेरुळ ८८.६७, गोठिवली ८४.७८ %, वाशी ८3.६९ %, खैरणे ८३.५८ % अशाप्रकारे शाळांचा निकाल जाहीर झाला आहे.

प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण माध्यमिक शिक्षण मिळावे अशू ऐच्छिक जबाबदारी स्विकारुन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २१ माध्यमिक शाळांमधून शिक्षण दिले जाते असून त्यामध्ये सर्व सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी संपादित केलेले यश सर्वार्थाने अभिनंदनास पात्र आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या समवेत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांचेही अभिनंदन. दहावी परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा! -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

करिअर मार्गदर्शनपर शिबिराचा घेतला ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी लाभ