साऊथ एशियन मर्दानी स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या मर्दानी खेळात गडांकुश यांना दोन सुवर्णपदके

अमित गडांकुश यांना नेपाळमधील आंतरराष्टी्य स्पर्धेत दोन सुवर्णपदकांचा लाभ                

नवी मुंबई ः काठमांडू-नेपाळ येथे २४, २५ व २६ मे रोजी पार पडलेल्या साऊथ एशियन मर्दानी स्पोर्ट चॅम्पियनशिप २०२३ या आंतरराष्टी्रय स्पर्धेमध्ये कोपरखैरणे येथील छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांनी मर्दानी खेळामध्ये (दांडपट्टा) स्वतंत्र व ग्रुप इव्हेंटमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोप पावत चाललेल्या मर्दानी कलेचा लोकांना विसर पडला असल्याने त्या कलेचा प्रसार व प्रचार वस्ताद अमित गडांकुश देशविदेशात करुन मर्दानी कलेसाठी सातत्याने कार्य करत असल्याबद्दल त्यांचे युध्दकलेच्या चाहत्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

‘सिडको'च्या सह-व्यवस्थापकीय संचालकांनी गाजवली दक्षिण आफ्रिका