इतिहास दर्शन -  रंजक की बोधक?

 इतिहास दर्शन -  रंजक की बोधक?

इतिहास दर्शन ज्याप्रमाणे रंजक आहे तसेच ते बोधकही आहे. इतिहासातून आपण काय बोध घ्यायचा? असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून इतिहासाचा अभ्यास करायचा. त्या काळी माणसाने ज्या चुका केल्या त्या होऊ नयेत म्हणून इतिहासाचा अभ्यास करायचा. हे काही अंशी खरे असले तरी इतिहासातून शिकण्यासारखेही बरेच आहे.

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची माहिती करून देणारे शास्त्र. इतिहास रंजक कसा ते आपण प्रथम विचारात घेऊ. हजारो वर्षांपूर्वी भारतात आजच्यापेक्षाही प्रगत असे लोक रहात असल्याचे अनेक पुरावे आपल्याला मिळाले आहेत, मिळतही  आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपले वेद हे सर्व ज्ञानानी परिपूर्ण असे ग्रंथ आहेत. त्यात औषधे, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्र-अस्त्रे, वास्तुशिल्प, चिकित्सा इत्यादींची सखोल माहिती आहे. आजची बांधकामे काही वर्षांमध्ये कोसळतात, त्यांना कितीही मजबूत बनवले तरी त्यांचे आयुष्य काही शे वर्षांचे असते, परंतु हजारो वर्षांपूर्वीची बांधकामे अजूनही चांगल्या स्थितीत आढळतात, त्यांच्यात भूकंप, महापूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी योग्य असे बदल केलेले आढळतात, की जे आजच्या काळातले स्थापत्यशास्त्रही करू शकत नाही. आजचे आधुनिक क्रेन्स जे वजन उचलू शकणार नाही, इतके मोठे दगड त्याकाळी बांधकामासाठी हजारो किलोमीटर नेले जायचे. ऐतिहासिक स्थापत्यशास्त्राचे उदाहरण घ्यायचे झाले तर वेरूळचे कैलास लेणे जे एका अखंड दगडात बांधले गेले आहे. रामसेतू हा स्थापत्यशास्त्रातला एक मोठा चमत्कार मानला जातो. जो आजही सॅटेलाईट वरून दिसतो. आजच्या आधुनिक काळातही असा पूल बनवणे म्हणजे एक मोठे आव्हान मानले जाते. समुद्रात सापडलेली श्रीकुष्णाची द्वारका नगरी हासुद्धा इतिहासकालीन स्थापत्यशास्त्राचा पुरावा म्हणता येईल.

भारतात अनेक ठिकाणी शिलालेख आहेत. पुरातत्व खात्याच्या नोंदीनुसार ते साधारण एक लाखाच्या आसपास आहेत. भारतातील सर्वात जुना शिलालेख हा राजस्थानमधील अजमेर जवळ बिडली या गावात आहे तो ५ व्या शतकातील ब्राम्ही लिपीत लिहिलेला  आहे. हे शिलालेख आपल्या भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात.  

रानाकपुर राजस्थान या ठिकाणी वृषभनाथ महाराजांचे जैन मंदिर आहे, हे मंदिर १५ व्या शतकात बांधले गेले आहे . त्याला ‘चौमुखा जैन मंदिर' म्हणतात. यात वृषभनाथ स्वतः खगोलीय ज्ञान ग्रहण करताना दाखवले आहेत. त्या मंदिराची खासियत जमिनीवर नाही तर गाभाऱ्याच्या छतावर आहे, ते छत पहिले तर ते सेम ‘स्वित्झर्लंड मधील' आर्टिकल एक्सलेटर ‘लार्ज डायड्रोनिक कोलायडर' सारखे आहे . हा कोलायडर २७ किलोमीटर लांब आहे.  यात छोटे अणू प्रकाशाच्या वेगाने जाऊन एकमेकांशी त्यांची टक्कर होईल अशा प्रकारची रचना आहे. त्यातून जी ऊर्जा निर्माण होईन ती सृष्टीची निर्मिती झाली तेंव्हा निर्माण झालेल्या उर्जे इतकी असेल. यावरूनच इतिहासात लोकांना या सृष्टीची निर्मिती कशी झाली याचे रहस्य माहित होते याचे पुरावे मिळतात.

हजारो वर्षांपूर्वी शस्त्र-अस्त्रांचे ज्ञान आजच्यापेक्षा कितीतरी प्रगत होते. श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र म्हणजेच लेझर वेपनचे उत्तम उदाहरण होते, जे रक्त वाहू न देता मस्तक धडावेगळे करायचे. रामायण-महाभारत या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेले ब्रम्हास्त्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एक अणू बॉम्ब होता. ते ज्या भागावर पडायचे तो संपूर्ण भागच उध्वस्त व्हायचा. म्हणून गुरु ही  विद्या योग्य शिष्याला द्यायचे, जो संयमाने हि विद्या वापरू शकेल. रामायणात रामाने रोमतुल्य नावाच्या राक्षसावर ब्रम्हास्त्र चालवल्याचा उल्लेख आहे आणि ते आजच्या पाकिस्तानजवळ राजस्थानच्या वाळवंटात पडले होते. १९९२ मध्ये थार वाळवंट राजस्थान मध्ये बांधकामासाठी खोदकाम केले असता मोठ्या परिसरात रेतीखाली रेडिओ ॲक्टिव्ह राखेचा थर सापडला जो सुमारे ८ ते १२ हजार वर्ष जुना होता. त्या ठिकाणी खोदकाम करताच तिथे एका शहराचे अवशेष सापडले. म्हणजे रामाने चालवलेले ब्रम्हास्त्र या ठिकाणी पडले याचा पुरावा मिळतो. रामायणात रावणाजवळ पुष्पक विमान असल्याचे उल्लेख आढळतात. तसेच तुकाराम महाराजांनाही स्वर्गात नेण्यासाठी विमान आले होते असे सांगितले जाते.  

 आपल्याकडे वैद्यक शास्त्रही प्रगत असल्याचे इतिहास सांगतो. आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये मेंदू, हृदयाच्या शस्त्रक्रिया फार पूर्वीपासून होत असल्याचे दाखले सापडतात. त्यावरून ऐतिहासिक काळात वैद्यकशास्त्रही प्रगत असल्याची उदाहरणे सापडतात. हे झाले हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे दर्शन, परंतु आधुनिक काळातले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्लेसुद्धा स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण मानले जातात. नक्कीच इतिहास दर्शन हे फक्त रंजक नाही तर कुतूहल निर्माण करणारे आहे.

इतिहास दर्शन ज्याप्रमाणे रंजक आहे तसेच ते बोधकही आहे. इतिहासातून आपण काय बोध घ्यायचा? असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून इतिहासाचा अभ्यास करायचा. त्या काळी माणसाने ज्या चुका केल्या त्या होऊ नयेत म्हणून इतिहासाचा अभ्यास करायचा. हे काही अंशी खरे असले तरी इतिहासातून शिकण्यासारखेही बरेच आहे. जसे रामाचा सत्यवचनी स्वभाव, हनुमानाची स्वामीभक्ती, भरत, लक्ष्मणाचे बंधुप्रेम, सीतेची सहनशीलता. कृष्णाचा मुत्सद्दीपणा, राजकारण, छत्रपती शिवाजी महाराजांची अवघ्या सोळाव्या वर्षी वाहिलेली स्वराज्याची शपथ, मावळ्यांची स्वामीनिष्ठा, पराक्रम , गनिमी काव्याचे युद्ध, शिवरायांची युद्धनीती ई.

 सती प्रथेविरुद्द आवाज उठवणारे तसेच विधवा पुनर्विवाहाला समाजात मनाचे स्थान मिळवून देणारे राजा राममोहन रॉय, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सर्वांनी स्त्रियांना समाजात मनाचे स्थान  मिळवून दिले. आपल्याला अनेक वर्षांपूर्वी संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेची शिकवण दिली. त्यांचाच वसा महात्मा गांधींनी पुढे चालवला, गांधीजींनी जनतेला स्वदेशीचा पुरस्कार करण्याचे आवाहन दिले, ज्याची गरज आजही भासू लागली आहे. लोकमान्य टिळकांचे परखड लिखाण हे त्यावेळी जनजागृतीचे मोठे साधन ठरले त्यामुळे आजही समाजात वृत्तपत्रांना मान आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारखे देशभक्त म्हणजे भारताच्या इतिहासाची शान आहेत. इतिहासातून बोध घेण्यासारखे खूप आहे. जे आजच्या काळातही आपल्याला मार्गदर्शक होईल.

मग इतिहास बोधक की रंजक या प्रश्नाचे माझे उत्तर आहे इतिहास जितका रंजक आहे,  तितकाच बोधकही आहे. तो जितका समजून घ्ोऊ तितका रंजक होत जातो आणि त्याचा जितका सखोल अभ्यास करू तितका तो बोधक वाटतो. -सौ. संपदा राजेश देशपांडे, पनवेल, जि. रायगड. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : डर्टी बॉय कोण?