युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा

युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेत ‘जपान विरुध्द पनवेल'

पनवेल ः युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा वॉरियर्स कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्ताने जपान विरुध्द पनवेल असा प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवयास मिळाला.

समाजसेवा बरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत कामोठे सेक्टर-६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल प्रांगणात युवा वॉरियर्स कबड्डी लीग या विद्युत प्रकाशझोतातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते १७ मे रोजी झाले. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तसेच परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या प्रारंभी जपान विरुध्द पनवेल या प्रेक्षणीय सामन्याने स्पर्धेत रंगत आणली.

याप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह जेष्ठ नेते वाय. टी. देशमुख, युवा नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसुमताई म्हात्रे, ‘भाजप ओबीसी सेल'चे उत्तर रायगड अध्यक्ष राजेश गायकर, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, दामोदर चव्हाण, तेजस जाधव, आदित्य भगत, अरुण भगत, नितेश पाटील, भाजप युवा नेते हॅप्पी सिंग, युवा नेते महेंद्र भोपी, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखेडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नाना मगदूम, भाजप सरचिटणीस सुशील शर्मा, ‘भाजप लीगल सेल'चे ॲड. जय पावणेकर, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या उद्‌घाटनावेळी युवा नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवा नेते परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कामोठे येथे सुरु असलेली तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धा पुरुष गटात होत असून, विजेत्या संघास २१ हजार १११ रुपये, उपविजेत्यास १५ हजार १११ रुपये तर तृतीय क्रमांकास ११ हजार १११ रुपये आणि तिन्ही विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

साऊथ एशियन मर्दानी स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या मर्दानी खेळात गडांकुश यांना दोन सुवर्णपदके