महापालिका शिक्षण विभागातर्फे यादी जाहीर

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५ शाळा अनधिकृत

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी महापालिका कधी प्रसिध्द करणार याकडे लक्ष लावून असलेल्या पालकवर्गाची चिंता अखेर मिटली आहे. नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने हद्दीतील ५ अनधिकृत प्राथमिक शाळांंची यादी १७ मे रोजी जाहीर केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च, २०२३ अखेर प्राथमिक शाळा शासनाची, नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५ शाळा मान्यतेशिवाय सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महारपालिका शिक्षण विभागाने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने जाहीर प्रकटन प्रसिध्द केले असून शाळा तात्काळ बंद करावी, असे जाहीर केले आहे.

दरम्यान, संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महापालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे. तसेच परवानगी शिवाय सुरु केलेली शाळा तात्काळ बंद करावी, अन्यथा त्यांच्याविरुध्द बालकांचा मोफत-सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे महापालिका शिक्षण विभागामार्फत सूचित करण्यात आले आहे.

सदर अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करुन नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आवाहन करण्यात येत आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.
संस्थेचे नांव शाळेचे नांव-पत्ता माध्यम
इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज,   इंग्रजी       
सेक्टर-८ बी, सीबीडी-बेलापूर.
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, आग्रीपाडा इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब,   इंग्रजी
सेक्टर-२७, नेरुळ.
द आटपाडी एज्युकेशन सोसायटी द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल (सीबीएसई),   इंग्रजी
सीवुडस्‌, सेक्टर-४०, नेरुळ.
ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ,किसननगर सरस्वती विद्यानिकेतन स्कुल, सेक्टर -५,   इंग्रजी
घणसोली.
(न्यायप्रविष्ठ प्रकरण याचिका क्र.९१६६/२०१५)
इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली इलिम इंग्लिश स्कुल,आंबेडकर नगर,रबाळे    इंग्रजी

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘बारावी'च्या लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतिक्षा संपली ; २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार