‘बारावी'च्या लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतिक्षा संपली ; २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार

प्रतिक्षा संपली; ‘बारावी'चा  २५ मे रोजी निकाल

नवी मुंबई ः आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाचे दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून आता विद्यार्थ्यांसह पालकांना ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक मंडळ'तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घ्ोण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या निकालानंतर सर्वप्रथम बारावी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. ‘बारावी'च्या लाखो विद्यार्थी आणि पालकांची या निकालाबाबतची प्रतिक्षा संपणार असून २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार असल्याचे बोर्डाने सूचित केले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये परीक्षा घेतल्यानंतर ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक मंडळ'कडून दहावी-बारावीच्या निकालाची तयारी सरु करण्यात आली. त्यामुळे बोर्डातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ मे पर्यंत बारावी परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अखेरीस राज्य मंडळाने ‘बारावी'चा ऑनलाईन निकाल २५ मे रोजी दुपारी २ वाजता घोषित होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘बारावी'च्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे.

महाराष्ट्रातून इयत्ता ‘बारावी'च्या परीक्षेसाठी एकूण १४,५७,२९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,९२,७८० विद्यार्थी तर ६,६४,४४१ विद्यार्थीनी आहेत. एकूण १०,३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. बारावी परीक्षा संपूर्ण राज्यात ३१९५ मुख्य केंद्रांवर घेण्यात आली होती.

दरम्यान, ‘बारावी'च्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण बोर्डाच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) विद्यार्थ्यांना घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध असेल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

‘बारावी' निकाल पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटः
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org
https://hindi.news18.com/news/career/board-result-maharashtra-board
https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
https://mh12.abpmajha.com

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी १२ जून पर्यंत मुदतवाढ