आरटीई २५ % प्रवेश नाकारल्यास शाळांवर कारवाई

आरटीई प्रवेशासाठी १५ मे पर्यंत शेवटची मुदत; तद्‌नंतर प्रतिक्षा यादीवरील प्रवेश प्रक्रिया

नवी मुंबई ः बालकांचा मोफत-सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, (आरटीई-२००९) मधील १२(१)(सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ % जागा वंचित आणि दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये काही शाळा आपल्या शाळेबाहेर बॅनर, बोर्ड लावून आरटीई २५ % अंतर्गत शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती शासनाकडून रवकम न मिळाल्यामुळे बालकांचे प्रवेश नाकारत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने शासनाने याबाबत परिपत्रक काढले आहे. तसेच जिल्ह्यांकडील शुल्क प्रतिपुर्तीच्या अनुषंगाने शासनाकडे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीसाठी पाठपुरावा सुरु असून शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांना तो वितरीत करण्यात येईल, असे सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

तरीही शाळा आरटीई २५ % अंतर्गत बालकांचे प्रवेश नाकारत असतील तर सदरची बाब गंभीर आहे. त्यामुळे अशा सर्व शाळांनी पालकांना प्रवेशासाठी योग्य ते सहकार्य करुन बालकांना शाळेत दाखल करुन घ्यावे. बालकांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता  घेण्यास  सुचित केले आहे.

दरम्यान, सर्व शाळांनी पालकांना प्रवेशासाठी निवड झालेल्या शाळेत निश्चिती केल्याची पडताळणी समितीच्या सही-शिववयाची शाळेकरिता असलेली प्रवेश पावती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व बालकांना संबंधित शाळेने प्रवेश देणे अनिवार्य आहे. ज्या शाळा, संस्था आरटीई २५ % अंतर्गत पात्र झालेल्या बालकांना प्रवेश नाकारत आहेत, अशा शाळांविरोधात आरटीई अधिनियम, नियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या सदर निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

शिक्षण हवक कायद्यानुसार दरवर्षी राज्यात २५ %  प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी जानेवारी महिन्यात राज्यातील आरटीई शाळांची नोंदणी करुन  घेण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यात पालकांना आरटीई पोर्टलवर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.त्यानुसार राज्यामध्ये आरटीई अंतर्गत ८,८२३ शाळांमधील १,०१,८४६ जागांसाठी ३,६४,४१३ अर्ज प्राप्त झाले.

यानंतर आरटीई २५ % प्रवेशा प्रक्रिया अंतर्गत ५ एप्रिल २०२३ रोजी पहिली ऑनलाईन सोडत काढण्यात आली आहे. लॉटरी पध्दतीने काढण्यात आलेल्या सोडतीनुसार राज्यातील ९४,७०० मुलांची प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरी निवड पध्दतीतील निवड झालेल्या पालकांना १२ एप्रिल २०२३ रोजी एसएमएस पाठविण्यात आले. त्यानुसार १३ एप्रिल पासून कागदपत्रांची पडताळणी विविध वेंÀद्रांमार्फत सुरु करण्यात आली. पालकांना आपल्या पाल्यांचा आरटीई अंतर्गत प्रवेश  घेण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली असून आता शेवटची मुदत १५ मे २०२३ पर्यंत आहे. यानंतर प्रतिक्षा यादीवरील पालकांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

दुसरीकडे आरटीई २५ % प्रवेश पोर्टलवर अतिरिवत भार येत असल्यामुळे पालकांना याबाबत तांत्रिक अडचणी येत असल्यााचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी दुसरी वेबसाईट सुरु करण्यात आली. यानंतर राज्यातील ५४,१९६  आरटीई अंतर्गत प्रवेश झाल्याचे ऑनलाईन पोर्टलवर दिसून येत आहे. 
 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

बारावीमध्ये १७९ विद्यार्थी, दहावीमध्ये २५२ विद्यार्थी उत्तीर्ण