डॉ. दामिनी विलास पाटील हिची दंत वैद्यकीय शास्त्रात जागतिक स्तरावर भरारी

 नवी मुंबईकर कन्येची दंत वैद्यकीय शास्त्रात जागतिक स्तरावर भरारी

नवी मुंबई ः काँजर्व्हेटिव्ह डेंटीस्ट्री या विषयावर ९ लघु शोध निबंध प्रकाशित केलेल्या M.D.S. एन्डोडोंटिस्ट डॉ. दामिनी विलास पाटील हिचा १० वा शोधनिबंध Endodontic Management Of The Mandibular First Molar With Six Root Canal : Case Report JETIR या जर्नलमध्ये एप्रिल २०२३ मध्ये प्रकाशित झाला असून या प्रकाशनात डॉ.दामिनी यांची ‘रिव्ह्यूवर मेम्बर' म्हणून निवड झाली आहे.

S.M.B.T.  दंत महाविद्यालय, संगमनेर, नगर येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ दामिनी पाटील यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण CBSC बोर्डाच्या D.A.V. पब्लिक स्कूल, नेरुळ, नवी मुंबई येथे तर पदवी शिक्षण B.D.S. येरळा दंत महाविद्यालय, खारघर येथे झाले आहे.  M.D.S. (एन्डो.काँजर्व्हेटिव्ह डेंटेस्ट्री) चे पुढील शिक्षण तिने M.I.D.S.R.  दंत महाविद्यालय, लातूर येथून घेतले आहे. नेहमीच A+ श्रेणीतूनच पास होणाऱ्या दामिनीने शिक्षणाबरोबरच शालेय जीवनात कला, क्रीडा व संस्कृतिक विभागातील अनेक स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे पटकावताना निबंध लेखन, चित्रकला आणि स्केटिंग स्पर्धेतही भाग घेऊन आपली वेगळी चमक दाखवून दिली आहे. टेबल टेनिस हा तिचा आवडीचा खेळ असून शालेय स्तरापासून तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरसुद्धा प्रथम क्रमांकाची बक्षीसे मिळवणारी डॉ.दामिनी CBSC बोर्डाच्या नॅशनल लेवल टेबल टेनिस स्पर्धेत गोल्ड मेडल विनरसुध्दा आहे. त्याबरोबरच शालेय स्तरावर प्रज्ञा शोध परीक्षा, होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, CBSCटॅलेंट सर्च परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले असून अलीकडेच  M.U.H.S.च्या  डिसेंबर, २०२२ मधील राज्यस्तरीय शोध निबंध प्रेझेन्टेशन स्पर्धेत असिस्टंट प्रोफेसर गटातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. डॉ दामिनी पाटील हिचे दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक Regenerative Endodontics हे दंत वैदयकीय क्षेत्रातील पुस्तक जागतिक स्तरावर अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी, फ्रेंच, इटली व पोर्तुगाल आदि नऊ देशात त्या त्या भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

आरटीई २५ % प्रवेश नाकारल्यास शाळांवर कारवाई