भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या नवी मुंबई पोलीस शर्मिला नाईक यांना पाचवे मानांक

नवी मुंबई पोलीस दलातील आंतरराष्ट्रीय खेळाडू शर्मिला नाईक यांना यूडब्ल्यूडब्ल्यूचे 5 वे मानांकन

नवी मुंबई : उझबेकिस्तान देशातील ताश्कंद येथे झालेल्या वर्ल्ड यु डब्ल्यु डब्ल्यु पॅनक्रेशन चॅम्पीयनशीप-2023 या स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक शर्मिला नाईक यांना पाचवे मानांक मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे पोलीस दलातून कौतुक होत आहे.  

उझबेकिस्तान देशातील ताश्कंद येथे 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत झालेल्या वर्ल्ड यु डब्ल्यु डब्ल्यु पॅनक्रेशन चॅम्पियनशीप-2023 या स्पर्धेत भारतीय संघाने सहभाग नोंदवला होता. जगभरातून 22 देशांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय संघाचे नवी मुंबई पोलीस दलातील आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या पोलीस नाईक शर्मिला नाईक यांनी प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्यांना पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यांनी मिळवलेल्या या मानांकन मुळे त्यांची नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीच्या वर्ल्ड कॉम्बेट गेम्ससाठी भारतीय संघात पॅनक्रेशन या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शर्मिला नाईक यांना आशियाई बेल्ट रेसलिंग संघटनेचे सचिव अमर मुख्तार तांबोळी तसेच ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग फेडरेशनचे (एआयटीडब्ल्यूएफ)अध्यक्ष सी.ए.तांबोळी यांचे मार्गदर्शन मिळाले. आपल्या देशासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे शर्मिला नाईक यांनी सांगितले.  

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

अक्षया शेडगेला सुवर्णपदक