भाजपच्या क्रीडा महोत्सवास कुकशेत मध्ये सुरुवात

भाजपच्या क्रीडा महोत्सवास माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

जुईनगर  :- भारतीय जनता पार्टी , प्रभाग क्र 34  नेरूळ आयोजित क्रीडा महोत्सवास माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  कला क्रीडा प्रेमींचा  मोठा प्रतिसाद मिळत आहे.  माजी  नगरसेवक  सुरज बाळाराम पाटील यांच्या पुढाकाराने  शुक्रवार पासून सुरू झालेल्या या स्पर्धा सलग तीन दिवस कुकशेत गाव येथील गावदेवी मैदानात खेळल्या जाणार आहेत. 

       या  क्रिडा   महोत्सवात बुद्धिबळ ,कॅरम, 100 मीटर आणि 200  मीटर धावणे , क्रिकेट सामने, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  पाक कला आदी   स्पर्धा असून  प्रत्येक स्पर्धात शेकडो संख्येत स्पर्धकानी सहभाग घेतला आहे . 

मोबाईलच्या युगात मैदानी खेळापासून आपली भावी पिढी दुरावत चालली आहे तर  माणसातील  भावनिक नाते लोप पावत आहे . याची जाण असणाऱ्या कुकशेत गावाचा आदर्श विकास करणाऱ्या सुरज पाटील यांनी या क्रीडा महोत्सवाचे भव्य आणि सुरेख  आयोजन केले असल्याचे आपल्या उदघाटनपर भाषणात सांगितले . कुकशेत गावचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सुरज पाटील यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे हट्ट करून कुकशेत गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली .जवळच सारसोले गावात सिबीएससी शाळा सुरू करून नेरूळमधील सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना उच्च आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची द्वारे खुली केल्याचे माजी महापौर सागर नाईक यांनी आवर्जून सांगितले .

कोरोना काळात मोबाईल विश्वात हरवलेली पिढी मैदानात उतरून  मैदानी खेळांविषयी आवड निर्माण व्हावी उद्याचे आदर्श खेळाडू निर्माण होऊन त्यांनी नवी मुंबई शहराचे नावलौकिक करावे म्हणून सदर भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यास मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे आयोजक सुरज पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले . यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच बाळाराम पाटील, श्रीकांत पाटील ,विनोद पाटील, संजय चौधरी, रविकांत तांडेल, शशिकांत तांडेल ,श्रीकांत परब आदी मान्यवर उपस्थित होते. सदर  स्पर्धा  यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेविका सुजाता पाटील , जयश्री ठाकूर , बजरंग माने आदींसह भाजप कार्यकर्ते योगदान देत  आहेत .

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

माझ्या यशात नवी मुंबई शहराचा मोठा वाटा -जेमिमा रॉड्रिवस