महापालिकेच्या सीबीएसई, माध्यमिक शाळांना मान्यता मिळवून देणारी संस्था सापडेना

महापालिकेच्या सीबीएसई, माध्यमिक शाळा अधिकृत कधी होणार?

वाशी ः नवी मुंबई महापालिका द्वारे नवी मुंबई शहरात सीबीएसई आणि माध्यमिक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, आजही या शाळांना सीबीएसई बोर्ड आणि राज्य शासन शिक्षण मंडळाच्या आवश्यक सर्व मान्यता नाहीत. या मान्यता मिळविण्यासाठी महापालिका शिक्षण विभाग आता सल्लागार नेमणार असून, त्यासाठी निविदा प्रकिया राबवली आहे. मात्र, सदर निविदेला प्रतिसाद लाभत नसल्याने महापालिकाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळा अधिकृत कधी होणार?, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई महापालिका शाळांत दरवर्षी पटसंख्या वाढत जात आहे. वाढती पटसंख्या पाहता महापालिकेने शाळा वाढवण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात ७९ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळा आहेत. तर दोन सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत. मात्र, आजही माध्यमिक आणि सीबीएसई शाळांना आवश्यक मान्यता नाहीत. या शाळांना परवानग्या मिळाव्या म्हणून महापालिका मार्फत प्रयत्न सुरु होते. मात्र, त्यास यश आले नाही. शाळांच्या आवश्यक मान्यतासाठी महापालिकाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या आवश्यक असणाऱ्या मान्यता मिळवण्यासाठी महापालिका शिक्षण विभाग आता सल्लागार नेमणार असून, त्यासाठी निविदा प्रकिया राबवली आहे. मात्र, सदर निविदेला प्रतिसाद लाभत नाही. त्यामुळे महापालिका शिक्षण विभागाने या निविदेला आता मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षण घत असलेल्या या शाळा अधिकृत कधी होणार?, असा प्रश्न आता पालक उपस्थित करीत आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक आणि सीबीएसई शाळांना अजूनही आवश्यक मान्यता नाहीत. त्यामुळे या मान्यता मिळवून देण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. - अरुणा यादव, शिक्षण अधिकारी - नवी मुंबई महापालिका

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पालकांनी तालुका, महापालिकेच्या पडताळणी समितीकडून पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन