स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (SBM) नवी मुंबई कॅम्पसमध्ये ५ वा दीक्षांत समारंभ संपन्न

आगामी  काळात होणार एनएमआयएमएस (NMIMS ) नवी मुंबई कॅम्पसच्या विस्तार

नवी  मुंबई :- एसव्हीकेएम (SVKM) च्या एनएमआयएमएस (NMIMS) स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (SBM) नवी मुंबई कॅम्पस मध्ये नुकताच ५ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला, यावेळी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 या वेळी विवेक अरोरा (कॉर्पोरेट एसव्हीपी आणि ग्लोबल हेड सदरलँड ग्लोबल सर्व्हिसेस) या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याचबरोबर डॉ. रुचिता वर्मा, (आय/सी डायरेक्टर, नवी मुंबई, एनएमआयएमएस) डॉ. जयंत पी. गांधी, (जे.टी. सेक्रेटरी एसव्हीकेएम आणि एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस चे नामनिर्देशित कुलपती), डॉ. शरद म्हैसकर (एव्हीकेएमच्या एनएमआयएमएस चे प्रो व्हाईस चांसलर) आणि आशिष आपटे ( परीक्षा नियंत्रक आणि एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस चे नामनिर्देशित सदस्य) तसेच अन्य कर्मचारी, इतर सदस्य आणि बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थीत होते. 

आर्टिफिशीयल इन्टेलिजन्स (AI), बिझनेस अॅनालिटिक्स, फिनटेक आणि एचआरआयएस या आंतरराष्ट्रीय स्तराच्या शिक्षणा सारखेच सक्षम असे नवीन कोर्सेस आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून , यशाची कारकीर्द कायम ठेवणे हेच एनएमआयएमएस नवी मुंबईचे उद्दिष्ट आहे. व्हीयूसीए च्या या नवीन युगात विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता सुधारण्याच्या उद्येश्याने हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. वाढत्या विद्यार्थी संख्येला सामावून घेण्यासाठी, एनएमआयएमएस नवी मुंबई या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपली क्षमता दुप्पट करणार असून यामुळे आता हे कॅम्पस १:१५ शिक्षक-विद्यार्थी रेशो प्रमाने जवळपास ५०००० विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास सक्षम बनेल. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिकेच्या सीबीएसई, माध्यमिक शाळांना मान्यता मिळवून देणारी संस्था सापडेना