दहावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिने मोफत उन्हाळी विशेष शिकवणी वर्गाचे आयोजन

खारघरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी विशेष शिकवण वर्ग 
 
खारघर  येथील सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेन्शल हायस्कूलने राजमाता जिजाऊ शैक्षणिक सबलीकरण योजना या उपक्रमाच्या माध्यमातून दहावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिने मोफत उन्हाळी विशेष शिकवणी वर्गाचे  आयोजन करण्यात आले आहे. प्रथम  येणार्‍यास प्रथम  प्रवेश  दिला  जाणार आहे. तेव्हा  गरजू व इच्छुकांनी विद्यार्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  
 
      सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेन्शल हायस्कूलच्या  महाराष्ट्र बोर्डाच्या  सिद्धार्थ हायस्कूल आणि सीबीएसईच्या अजिंठा स्कूलमध्ये मार्च नववी उत्तीर्ण झालेल्या येत्या  शैक्षणिक वर्षात दहावीत शिक्षण घेणाऱ्या   विद्यार्थ्यांसाठी संस्थेने “ राजमाता जिजाऊ शैक्षणिक सबलीकरण  योजना”  अंतर्गत सहावी वी ते नववी   वर्गात गणित, इंग्रजी व सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयात कमकुवत तथा आभ्यासात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षकांकडून 1  मे   30 जून  या  कालावधीत मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन केले आहे. तसेच  मुंबई महानगर प्रदेशातील  2023-24 या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या  प्रवेश दिला जाणार आहे. हे  वर्ग सर्व  जाती – जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क  आहेत.तर  ग्रामीण  भागातील  तथा खारघर पासून लांब  राहणार्‍या विद्यार्थ्यांना सम्राट अशोक हॉस्टेल फॉर  ईड्ब्ल्यु एस आणि यशोधरा मुलीचे हॉस्टेल मध्ये संस्थेच्या वतीने  निशुल्क  राहण्याची व भोजनाची निशुल्क सोय  करण्यात  आली  आहे.  संस्थेचे  अध्यक्ष  प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर म्हणाले  हे वर्ग इंग्रजी आणि मराठी  माध्यमात  दिले जाणार आहे.  सकाळी सात  ते  दहा आणि सायंकाळी सहा ते नऊ  या  वेळात  होणार आहेत. निवासी  विद्यार्थांसाठी वर्गाचे  वेळापत्रक प्रवेशानंतर  जाहीर  केले  जाणार असून  मुली  आणि  मुले  ह्या  दोघांसाठी हे वर्ग असणार आहे. विशेष म्हणजे गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी या विषयांसह  अन्य  विषयात क्लीनिकल अध्यापन पद्धतीचा वापर  करून  विद्यार्थी ज्या  विषयात  कमकुवत आहेत त्या विषयात सक्षम  करण्याचा  हेतू ह्या  धडे दिले जाणार आहे. गरजू व इच्छुकांनी ई- मेल (satyagrahacollege@yahoo. Com) यावर नाव नोंदवावे  अथवा  सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेन्शल हायस्कूल, सुप्पारक  भवन, प्लॉट नं 52 सेक्टर19 खारघर  नवी मुंबई  येथे  प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन कारणात आले आहे. 
Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (SBM) नवी मुंबई कॅम्पसमध्ये ५ वा दीक्षांत समारंभ संपन्न