नवीन शैक्षणिक धोरणाबाबत संयुक्त कार्यशाळा राबविण्याची मागणी

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत संयुक्त कार्यशाळा राबविण्याची विजय नाहटा यांची मागणी 

 नवी मुंबई ः शैक्षणिक क्षेत्रात बदलाचे वारे आणणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे. नवीनशैक्षणिक धोरण नक्की कसे असेल? बदलत्या शैक्षणिक परिस्थितीला सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे? नवीन शैक्षणिक धोरणबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करणे यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांना पाचरण करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करावे, अशी मागणी माजी सनदी अधिकारी तथा ‘बाळासाहेबांची शिवसेना'चे उपनेते विजय नाहटा यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे. नवीन धोरणात पदवी स्तरावरील क्रेडीट गुणांकन, विषय निवडीतील स्वातंत्र्य, इयत्ता दहावीची परीक्षा बोर्डाची असेल किंवा नसेल, मुलांना इयत्ता दहावीचा अभ्यास करण्यासाठी खाजगी क्लासेस लावावेत किंवा कसे? इयत्ता नववीची परीक्षा बोर्डाची असेल का? किंवा कसे? असे बरेच समज गैरसमज पसरले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करुन त्यात शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ मंडळींना मार्गदर्शनासाठी पाचारण करावे, असे उपनेते विजय नाहटा यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

दहावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिने मोफत उन्हाळी विशेष शिकवणी वर्गाचे आयोजन