रोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थी आणि नियोक्ते यांनी दि.०९ एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

परदेशात नोकरीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

 ठाणे  :- भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी नँशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएएसडीसी) यांचे मार्फत दि. २१ फेब्रुवारी २०२३ ते दि. २६ मे. २०२३ या दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ९ एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

            एनएसडीसी या डिजीटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी आणि नियोक्ते यांनी दि. २१ फेब्रुवारी २०२३ ते दि.०९ एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी करावी. त्यानंतर दि. १० एप्रिल २०२३ ते  दि. १६ एप्रिल २०२३ या काळात ऑनलाईन स्क्रिनिंग आणि भाषा चाचणी होणार आहे. दि. ०१ मे २०२३ ते दि.०७ मे २०२३ दरम्यान उमेदवार ऑनलाईन मँपिंग होणार असून दि. १५ मे २०२३ ते  दि. ३० मे २०२३ या कालावधीत भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फेऱ्या या दि. ३१ मे २०२३ ते दि. ०८ जून २०२३ होणार आहेत.

            या रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी

 https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच

तसेच विविध कंपन्या/उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी

https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/international/company/  या लिंकवर भेट द्यावी.

            ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (प) येथे किंवा दुरध्वनी क्र.०२२-२५४२८३०० वर संपर्क साधावा.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

बेलापूर मध्ये रंगला सायकल  कट्टा