नवी मुंबईकर ओमी केणी यांनी सामनावीर म्हणून पटकावली चार चाकी कार

नवी मुंबईकर ओमी केणीची  भिवंडीत चमकदार कामगीरी

नवी मुंबई -: नवी मुंबईतील दिवा गावातील ओमी केणी याने भिवंडी येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगीरी करत सामनावीर म्हणून असलेली चार चाकी कार पटकावली आहे आणि अशी कार पटकावणारा  तो नवी मुंबईतील पहिला खेळाडू ठरला आहे.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सिद्धिविनायक मंडळ अंजूर यांच्या माध्यमातुन केंद्रिय राज्यमंत्री पंचायती राज चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी  अशी स्पर्धा असून २२ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ अशी ही स्पर्धा रंगली. अंतिम सामना बामण डोंगरी(उरण) व नव साथी दिवा नवी मुंबई यांच्यात होता. मात्र खराब हवामानामुळे  हा सामना बॉल ऑउट पद्धतीने पार पडला. यात बामण डोंगरी(उरण) संघ विजयी ठरला.

प्रथम क्रमांकला ११ बाईक व द्वितीय क्रमांक ५ बाईक  v4 सामनावीर चार चाकी कार असे असे बक्षीसाचे स्वरूप होते. मात्र या संपूर्ण स्पर्धेत नव साथी दिवा संघाचा फलंदाज ओमी केणीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्याने अष्टपैलू कामगिरी करत सामना वीर म्हणून असलेली चार चाकी कार  पटकावली आहे.आणि अशी कार पटकावणारा  तो नवी मुंबईतील पहिला खेळाडू ठरला आहे.अवघे २० वर्ष वय असलेल्या .ओमी केणीची ब्याट चांगलीच तळपळत आहे. त्याच्या नावावर  आतापर्यंत ३० अर्ध शतके व एक शतकाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओमी केणीने केलेल्या या चमकदार कामगीरीमुळे त्याच्या संपूर्ण नवी मुंबईतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर त्याचा कामगिरीबद्दल लवकरच त्याचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती नवी मुंबईचे  सुप्रसिद्ध गोल्डन मन नीलेश चंदू पाटील यांनी दिली.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार