आदिवासी मुलांना शालेय गणवेश आणि सायकलचे वाटप

द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम 

 नवी मुंबई : द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट मुंबई (सीआरटी,सीएसडब्ल्यू) च्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जामसर हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेले आदिवासी विद्यार्थ्यांना २५ सायकल, शाळेचा गणवेश, शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने रेल्वे तिकीट चेकिंग कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्पेअर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यात सहभागी होत गरजूंना मदतीचा हात पुढे करतात. त्यानुसार पालघर जिह्यातील जव्हार तालुक्यामध्ये असलेल्या जामसर हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेले आदिवासी मुले अनेक किलोमीटर पायपीट करत शिक्षण घेत आहेत. याची माहिती ट्रस्टच्या सदस्यांना मिळल्यानंतर या विद्यार्थ्यांची रोजची पायपीट थांबण्यास मदत व्हावी या उद्देशाने द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्पेअर ट्रस्टच्या सदस्यांनी सोसायटीच्या आवारामध्ये पडुन असलेल्या तसेच कोणी वापरत नसलेल्या सायकली जमा करण्याचे आवाहन केले होते.  

सदर आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळल्यानंतर 25 सायकल जमा झाल्या. त्यानुसार जमा झालेल्या सायकली दुरुस्ती करून त्या आदिवासी भागातील शाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशचे वाटप, शालेय साहित्य यामध्ये परीक्षा पॅड, पेन, पेन्सिल, रबर या सोबतच स्वामी विवेकानंद महाराज यांचे पुस्तके देऊन त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष सुहास जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.  

 यावेळी जामसर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व शालेय स्पर्धा विजेत्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष हरिचंद्र मोडकर, सचिव डी. व्ही. चिदरकर, सहसचिव अभय कांबळे, खजिनदार गिरिश कदम, ट्रस्टी लीना गोरडे आदींसह जामसर हायस्कूलचे चेअरमन विठ्ठल थेतले, मुख्याध्यापक एस. बी. सुरोशी, समाजसेविका अलका मेटकर व शिक्षक वर्ग उपस्थित होते.  

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका सी बी एस ई शाळा प्रवेश प्रकियेला सुरुवात