महापालिका सी बी एस ई शाळा प्रवेश प्रकियेला सुरुवात 

नवी मुंबई महापालिकेच्या दोन सी बी एस ई शाळांत  २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रकिया सुरू

नवी मुंबई -: मार्च महिना उजाडला तरी देखील नवी मुंबई महानगरपालिकेच्या दोन सी बी एस ई. शाळांत  २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रकिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही  प्रवेश प्रकिया तात्काळ सुरू करावी अशी मागणी माजी नगरसेवक.भरत जाधव यांनी केली होती आणि याची दखल मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतली असून शाळा प्रवेशाला सुरुवात करण्यात आली आहे. सीवूड सेक्टर ५० आणि कोपरखैरणे सेक्टर ११ या शाळांसाठी हे प्रवेश अर्ज २५ मार्च पर्यंत उपलब्ध असतील.

नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने प्राथमिक,माध्यमिक आणि सी बी एस ई शाळांत शहरातील विद्यार्थ्याना शिक्षण दीले जाते आणि या शाळांत दरवर्षी पटसंख्या वाढत चालली असून सी बी एस ई शाळांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या सीवुड  आणि कोपरखैरणे येथे दोन शाळा सुरू आहेत. शहरातील खाजगी शाळांत सरासरी डिसेंबर महिन्यात प्रवेश प्रकिया सुरू केली जाते. मात्र महापालिकेने मार्च महिना उजाडला तरी देखील सण २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता शाळांत प्रवेश प्रकिया सुरू केलेली नाही. त्यामुळे ऐन वेळी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी कुठे जायचे?असा सवाल करत ही प्रवेश प्रकिया तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या केली आहे आणि मागणीची दखल घेत या प्रवेश प्रकीयेला सुरुवात केली आहे. प्रत्येक शाळेत १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून  ३ वर्ष पूर्ण केलल्या पाल्यांना नर्सरी प्रवेशासाठी ही प्रवेश प्रकिया सुरू करण्यात आली असून  दिनांक २५ मार्च २०२३ पर्यंत पालकांनी सर्व कागद पत्रंसहीत अर्ज सादर करावे असे आवाहन शिक्षण विभगाच्या वतीने उपायुक्त योगेश कडूस्कर यांनी केले आहे.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

रोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थी आणि नियोक्ते यांनी दि.०९ एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन