आज-उद्या घणसोलीत ४० प्लस क्रिकेटचा थरार

नवी मुंबई महापालिका चषक ४० प्लस क्रिकेट स्पर्धेेचे आयोजन

नवी मुंबई ः विविध खेळांना व्यासपीठ मिळवून देऊन नवी मुंबईतील खेळाडुंना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेचा क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभाग सातत्याने कृतीशील राहिला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

यामध्ये क्रिकेट देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असून नवी मुंबईतही क्रिकेटचे अनेक संघ कार्यरत आहेत. क्रिकेटच्या विविध स्पर्धांचेही आयोजन मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. त्यातही वयाच्या चाळीशी नंतर क्रिकेट सारख्या खेळाच्या माध्यमातून स्वतःच्या आरोग्याविषयी जागरुक असणाऱ्या क्रिकेटपटुंचे अनेक संघ नवी मुंबईत मोठ्या संख्येने आहेत. सदर
बाब नवी मुंबईच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. अशा चाळीशी नंतरही क्रिकेटच्या माध्यमातून आरोग्याची जपणूक करणाऱ्या खेळाडुंना प्रोत्साहित करण्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ४० प्लस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. नव्या उत्साहाने नवी मुंबई महापालिका चषक ४०प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ३ आणि ४ मार्च रोजी
घणसोली येथील ४० प्लस क्रिकेट मैदानावर करण्यात आले आहे.

आज ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना खेळविण्यात येणार असून उद्या ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. याप्रसंगी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ४० प्लस खेळाडुंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी केले आहे.

 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

नवी मुंबई महापालिका तर्फे ‘फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा'चे आयोजन