बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी बोलण्याने राजभाषा दिनाचा सन्मान -नंदकुमार जोशी

 श्री दत्त विद्या मंदिर सानपाडा शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

नवी मुंबई ः सानपाडा मधील नवी मुंबई महापालिका श्री दत्त विद्या मंदिर शाळा क्र.१८ आणि माध्यमिक शाळा क्र.११६ या शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ फेब्रुवारी रोजी शाळेच्या प्रांगणात पार पडले. या स्नेहसंमेलनाप्रसंगी ‘छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ'चे अध्यक्ष नंदकुमार जोशी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, स्नेहसंमेलनाच्या निमंत्रक माजी नगरसेविका कोमल वास्कर, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, विवेकानंद संकुल शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे, मुख्याध्यापिका रश्मी विघ्ने, सुवर्णा सागवेकर, नायर मॅडम, वनिता बांगर, साळवे सर, आहेर, सानपाडा गार्डन-७.५० ग्रुपचे सदस्य, विभागप्रमुख आशिष वास्कर, शाखाप्रमुख अजय पवार, रणधीर सुर्वे, अनंता ठाकूर, प्रल्हाद गायकवाड, महिला आघाडीच्या सुलभा कोसरकर, कविता ठाकूर, दर्शना चव्हाण, पत्रकार मारुती विश्वासराव, आदि मान्यवर उपस्थित होते.


महापालिकेच्या श्री दत्त विद्या मदिर सानपाडा शाळेत बहुभाषिक विद्यार्थी असताना देखील ते मराठी उत्तम बोलत आहेत. सदर बाब मराठी राजभाषा दिनाचा सन्मान असल्याचे छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी यांनी सांगितले.

गेली २ वर्ष कोव्हीड काळ वगळता महापालिका शाळेत सातत्यपूर्व होत असलेल्या कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे कौतुक मान्यवरांनी केले. सन १९५२ साली तत्कालीन सरपंच काशीनाथ नथू पाटील यांनी ‘जिल्हा परिषद'च्या माध्यमातून सुरु केलेल्या शाळेचे आज सर्व सोयिनियुक्त शाळेत रुपांतर झाल्याच्या अभिमान माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करणारी एकमात्र शाळा म्हणून कायम आम्हाला आमच्या सानपाडा शाळेचा अभिमान वाटत आहे, असे गौरवोद्‌गार माजी नगरसेविका कोमल वास्कर यांनी काढले.


 सदर कार्यक्रमाचे सूत्रासंचलन महिला आघाडी उपशहरसंघटक स्मिता ढमामे यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक दर्शन भोईर, मुख्याध्यापिका प्रतिभा पांचाळ, सर्व शिक्षक वृंद आणि शाळेचे बहूद्देशिय कर्मचारी यांनी सदर सोहळा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाकरिता विघ्नेश जोशी आणि सुनील लोखंडे यांनी विद्यार्थ्यांकडून नृत्य बसवून घ्तले. यावेळी विद्यार्थी आणि पालक यांच्या जेवणाची जबाबदारी गायत्री चेतना केंद्राचे मन्नुभाई पटेल यांच्या वतीने करण्यात आली. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

टॅबलॅब द्वारे विद्यार्थी जिज्ञासा पुर्ततेतून स्वयंपूर्ण बनणार -राजेश नार्वेकर