ज्ञानदीप विद्यालयात विज्ञान दिन साजरा

ज्ञानदीप विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन, विज्ञान प्रदर्शन भरवून उत्साहात साजरा

नवी मुंबई ः ज्ञानदीप विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन, विज्ञान प्रदर्शन भरवून उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे विज्ञान शिक्षक-प्रशिक्षक शेखर जगताप, माजी, मुख्याध्यापिका सौ. शोभना पाटील, ‘ज्ञानदीप संस्था'च्या कार्यकारी मंडळ सदस्या सुरेखा तांडेल, पंडीत तांडेल, प्रसाद तांडेल यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान प्रदर्शनात १३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ६० विज्ञान प्रयोग आणि प्रतिकृती सादर केल्या.


शिक्षक शेखर जगताप यांनी विज्ञान आपल्या जीवनाशी कसे निगडित आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी सांगताना कोणत्याही चमत्कारा मागे विज्ञान असते, ते स्पष्ट केले. तसेच समस्या निवडून त्या समस्येवर उपाय शोधणे म्हणजे नवनिर्मिती असल्याचे ते म्हणाले. तसेच राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आणि इन्स्पायर अवार्ड मानक योजनेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. मुलांचे कुतूहल जागृत असावे, त्यांच्या प्रश्नांना शिक्षकांनी आणि पालकांनी समर्पक उत्तर द्यावे. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा, प्रदुषण नियंत्रण, वैज्ञानिक उपकरणे, गणिती उपकरणे, अवकाश अशा विविध विषयांवर प्रयोग मांडले. याचवेळी ‘ज्ञानदीप इंग्लिश वलब'चे कार्यक्रम आणि विज्ञान प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांच्या सहभागाने पार पडले. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. संस्थेच्या अध्यक्ष  रवींद्र नाईक यांच्या प्रेरणेतून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रत्नाकर तांडेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी बोलण्याने राजभाषा दिनाचा सन्मान -नंदकुमार जोशी