राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व  स्पर्धेत विवेक वारभुवन प्रथम

विवेक वारभुवन शब्द योद्धा म्हणून सन्मानित

नवी मुंबई : व्ही एस. वरिष्ठ महाविद्यालय, चेंबूरचा विद्यार्थी आणि नवी मुंबईचा रहिवासी विवेक वारभुवनने रोटरी क्लब ऑफ धुलियाँ आणि युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून तो शब्द योद्धा वक्तृत्व चषक पर्व ३ रे २०२३ चा विजेता ठरला आहे.  रुपये ७०००/- रोख, चषक आणि सन्मान पत्र असे बक्षीसाचे स्वरुप आहे. २६ फेब्रूवारीस ही स्पर्धा पार पडली.

‘त्याने आत्महत्या केली आणि मी कविता केली' या ज्वलंत विषयावर विवेक वारभुवन याने आपले विचार मांडले व प्रथम येण्याचा मान मिळवला. धुळे येथील एस. एस. व्ही. पी. एस. वरिष्ठ महाविद्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत प्रा. स्वप्नील इंगोले व प्रा. योगेश पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले तर भडगाव नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ज्ञानदीप विद्यालयात विज्ञान दिन साजरा