रिलायन्स संघाने सदर स्पर्धा चारवेळा जिंकली

डी.वाय.पाटील टी-२०क्रिकेट स्पर्धेत रिलायन्स-१ अजिंवय

नवी मुंबई ः डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्टस्‌ ॲकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या ऑड इंडिया डी. वाय. पाटील टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अजिंवयपदाचा मान भारतीचा क्रिकेटपटू पियुष चावला याच्या नेतृत्वाखालील रिलायन्स-१ संघाने पटकावला. विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात रिलायन्स-१ संघाने यजमान डी.वाय.पाटील-ब संघाचा अवघ्या १ धावेने पराभव केले. रिलायन्स संघाने सदर स्पर्धा चारवेळा जिंकली आहे.

 अंतिम सामन्यात झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात रिलायन्स १ ने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून रिलायन्स १ ने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकली आहे. १४ ते २५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १७ वीडी. वाय. पाटील टी-२० क्रिकेट स्पर्धा नेरुळ मधील डी. वाय. पाटील स्टेडीयम आणि डी. वाय. पाटील विद्यापीठच्या क्रीडांगणावर खेळविण्यात आली. या स्पर्धेत रिलायन्स१, डी.वाय.पाटील-अ/ब, इंडियन ऑईल, टाटा, आरबीआय, इन्कम टॅवस, बीपीसीएल, मुंबई कस्टम, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सीएजी, जैन इरिगेशन, सेंट्रल रेल्वे, एअर इंडिया, इंडियन नेव्ही अशा देशातील १६ नामांकित संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ फेब्रुवारी रोजी डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर प्रकाशझोतात खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात डी. वाय. पाटील बी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स-१ संघाने २० षटकात एकूण १५३ धावाबनविल्या गेल्या. यात रिलायन्स-१ तर्फे सर्वाधिक धावा हृतिक शोकीन याने ३४ चेंडूत ५३ धावा केल्या. तर डी.वाय. पाटील संघाच्या वतीने बलतेज सिंग यांनी ४ विकेटस्‌ घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल भारताचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि इतर फलंदाजांच्या जोरावर डी.वाय. पाटील-ब संघाने चांगली सुरुवात केली होती. पण, संघांच्या विकेटस्‌ ठराविक अंतराने गेल्याने डी.वाय.पाटील संघाला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी ७ धावांची गरज होती. यावेळी त्यांचे दोन गडी बाद होणे शिल्लक होते. उत्कंटावर्धक झालेल्या या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर डी. वाय. पाटील संघाला २ धावांची गरज असताना त्यांचा अखेरचा फलंदाजही झेलबाद झाला आणि रिलायन्स-१ संघाने एका धावाने अतिशय चुरशीचा सामना जिंकला. रिलायन्स संघाचा हृतिक शोकीन अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

 आज-उद्या घणसोलीत ४० प्लस क्रिकेटचा थरार