ठाणे जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक्स मधील खेळाडुंचा सत्कार

खेलो इंडिया, राष्ट्रीय स्तर पदक विजेत्यांचा सत्कार

ठाणे ः खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन पदक मिळवलेल्या ठाणे जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक्स मधील खेळाडुंचा २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, क्रीडा अधिकारी सुचिता ढमाले आणि सर्व खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील आर्टिस्टीक खेळाडू आर्यन दवंडे याने केरळमध्ये त्रिवेंद्रम येथे झालेल्या कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद तसेच ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कास्य पदक तसेच मध्य प्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत २ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कास्य पदक मिळविले आहे. या स्पर्धेत मानस मानकवले याने सुवर्ण पदक मिळविले आहे. तसेच सारा राऊळ  हिने मध्य प्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद पटकावत सुवर्ण पदक तर कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत १ रौप्य आणि २ कास्य पदक मिळविले. क्रीशा शाह आणि अनन्या शेट्टी यांनी सहभाग घेत सांघिक सुवर्ण पदक मिळविले. रांची येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रिन्स जैन याने ६ सुवर्ण पदक मिळविले आणि खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग नोंदविला. यासोबतच कोलकोता येथे झालेल्या सब-जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेत साक्षी दळवी हिने विजेतेपद पटकावत ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदके मिळविली.

या सर्वांचा तसेच राष्ट्रीय स्पर्धा आणि खेलो इंडिया पदक विजेते खेळाडू  श्रेयस मंडलिक, सृष्टी भावसार यांचाही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सर्व खेळाडू दररोज ठाणे येथील सरस्वती क्रीडा संकुल येथे महेंद्र बाभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

दरम्यान, पदक विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन करत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी खेळाडुंना आशिर्वाद दिले. तसेच भविष्यात लागणाऱ्या सुविधांबाबत आश्वत केले.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या नवी मुंबई पोलीस शर्मिला नाईक यांना पाचवे मानांक