एफ.जी.नाईक कॉलेजचा ‘जल्लोष' संपन्न

एफ. जी. नाईक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई ः कोपरखैरणे येथील ‘श्रमिक शिक्षण मंडळ'च्या एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष-२०२३ वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झाले.
 या कार्यक्रमाप्रसंगी ‘श्रमिक शिक्षण मंडळ'चे संस्थापक आमदार गणेश नाईक, अध्यक्ष संदीप नाईक, विश्वस्त संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, ‘शेतकरी शिक्षण मंडळ'चे अध्यक्ष देविदास म्हात्रे, माजी नगरसेवक लिलाधर नाईक, भारती पाटील, समाजसेवक दाजी सणस, नारायण शिंदे, नितीन म्हात्रे, ‘श्रमिक शिक्षण मंडळ'चे सदस्य सदानंद म्हात्रे, अक्षय नाईक, आदिती नाईक, प्रशासक नरेंद्र म्हात्रे, क्रीडा व्यवस्थापक सुधीर थळी, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, विद्यालयाच्या प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका रेखा म्हात्रे, इंग्रजी विभाग मुख्याध्यापिका सुमती सुबय्या, प्रा. डॉ. दत्तात्रय घोडके, सांस्कृतिक विभागप्रमुख योगिता पाटील, प्रा. डॉ. कविता पवार, प्रा. सीमा शिंदे, प्रा. चिन्मयी वैद्य, प्रा. संगीता वास्कर यांच्यासह इतर प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. गणेश नाईक यांनी ‘श्रमिक शिक्षण मंडळ'च्या स्थापनेमागची भावना व्यक्त करीत संस्थेचा शिक्षण क्षेत्रातील सेवाभाव स्पष्ट केला. संस्थेतील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतच आहे; पण सामाजिक क्षेत्रातही उत्तम कार्य करीत आहेत. आपल्या संस्थेमधून बाहेर पडणारा विद्यार्थी आदर्श नागरिकच बनून निघेल आणि सामाजिक कार्यात सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ‘श्रमिक शिक्षण मंडळ'मध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, माणुसकी, सामाजिक बांधिलकी या मूल्यांची शिकवण दिली जाते असून संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक यांनी विनम्रता, संयम आणि विनय बाळगून आपली भूमिका चोखपणे निभवावी, असे आवाहनही नाईक यांनी केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. तसेच सांस्कृतिक विविधता, कलाकृतीची नाविन्यता याची जाणीव विद्यार्थ्यांना करुन देणे, आंतरमहाविद्यालयीन, महाविद्यालयीन स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांचा सर्वांगीण विकास करणे, असा स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयश्री दहाट तसेच विद्यार्थी गायत्री, इशा, आकांक्षा, विशाखा, साई, स्नेहल, ओंकार, अंकिता यांनी केले. तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. योगिता पाटील यांनी मानले. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व  स्पर्धेत विवेक वारभुवन प्रथम