जे. एम. म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त व्ही. के. हायस्कुल पनवेल येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 ‘जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था'च्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल ः ‘जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था'चे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्ही. के. हायस्कुल पनवेल येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धा विविध ४ गटात घ्ोण्यात येऊन यात जवळपास १६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घ्ोतला होता. या स्पर्धेचा निकाल शिवजयंती निमित्त जाहीर करण्यात आला.

स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रकारे आपली चित्रे काढली होती. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ‘जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था'तर्फे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माजी चेअरमन विक्रांत दत्तात्रेय शितोळे (आंतरराष्ट्रीय चित्रकार) उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच उत्तेजनार्थ अशा प्रकारे बक्षीसे काढण्यात आली आहेत. त्यात प्रथम क्रमांक पटकावलेला स्पर्धकांसह इतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ‘जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था'चे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे. गट क्रमांक-१ः इयत्ता पहिली ते चौथी प्रथमः आराध्या रमेश पाटील, (४ थी), डीएव्ही स्वुÀल.
गट क्रमांक-२ ः इयत्ता पाचवी ते सातवी
प्रथमः तमैका, शांती निकेतन शाळा.
गट क्रमांक-3  ः इयत्ता आठवी ते दहावी
प्रथमः पार्थ रामचंद्र ढोबळे, १०वी, न्यू होरायजन स्वुÀल.
गट क्रमांक- ४ ः इयत्ता अकरावी व त्यापुढील
प्रथमः प्रेरणा विद्यानंद वाकोडे, पिल्लई कॉलेज. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एफ.जी.नाईक कॉलेजचा ‘जल्लोष' संपन्न