एफ.जी.नाईक महाविद्यालयात सावित्री जिजाऊ सप्ताह मोठ्‌या उत्साहात संपन्न

कोपरखैरणेतील एफ.जी. नाईक महाविद्यालयात महिला विकास कक्ष व मराठी वाड:मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री जिजाऊ सप्ताह साजरा

नवी मुंबई : कोपरखैरणेतील एफ.जी. नाईक महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व मराठी वाड:मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री जिजाऊ सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताह मध्ये सुंदर हस्ताक्षर, काव्यवाचन, कथाकथन स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर व्याख्यान आयोजनात आले. या सर्व स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महाविद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या शिक्षणाप्रती, त्यांच्या हक्कांप्रती जागृती व्हावी, समाजातील विविध कर्तुत्वान स्त्रियांचा आदर्श घेऊन भविष्यात त्यांनी वाटचाल करावी, या उद्देशाने एफ.जी. नाईक महाविद्यालयातील सावित्री जिजाऊ सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एफ जी नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. स्मृतिगंधा बिडकर. मराठी वाड:मय मंडळ प्रमुख प्रा. सीमा शिंदे उपस्थित होते. 

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. विमल बिडवे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई व जिजामाता यांचे उदाहरण देत शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन स्वतःचे भवितव्य व येणाऱ्या पुढील पिढीस उत्तम रित्या घडवावे असे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील खडतर प्रवास विषद करत विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीशी हार न मानता त्यावर मात करत यशाकडे वाटचाल करावे, असे मार्गदर्शन केले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी देखील आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या सप्ताहात आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थिनींनी स्त्रीवादी कवितांचे काव्यवाचन करून त्यातील स्त्रियांच्या व्यथा वेदना प्रकट करून आशय मांडणीचे सादरीकरण केले. कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक आशयाच्या सुरेख अशा कथांचे सादरीकरण केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

जे. एम. म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त व्ही. के. हायस्कुल पनवेल येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन