दहावी, बारावी परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना

दहावी, बारावी परीक्षाः मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन सुरु

नवी मुंबई ः फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक तसेच संबंधित घटकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक, शिक्षक समुपदेशक यांच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा १५ फेब्रुवारी पासून सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहील.

हेल्पलाईन क्रमांक ०२२-२७८९३७५६ आणि ०२२-२७८८१०७५ असे आहेत. कार्यालयातील हेल्पलाईनसाठी सहसचिव डॉ.ज्योती परिहार (७७५७०८९०८७), वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.) गीता तोरस्कर  (७०२१३२५८७९), वरिष्ठ अधीक्षक सुप्रिया मोरे (९८१९१३६१९९) आणि वरिष्ठ अधीक्षक सुवर्णा तारी  (९९८७१७४२२७) या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर समुपदेशक म्हणून श्रीकांत शिनगारे (९८६९६३४७६५), मुरलीधर मोरे (७९७७९१९८५० / ९३२२१०५६१८, ०२२-२७८९३७५६/ ०२२-२७८८१०७५), हयाळीज बी.के. (९४२३९४७२६६), अनिलकुमार गाढे (९९६९०३८०२०), विकास जाधव (९८६७८७४६२३), विनोद पन्हाळकर (९५२७५८७७८९), संजय जाधव (९४२२५९४८४४), चंद्रकांत मुंढे (८१६९६९९२०४), अशोक सरोदे (९३२२५२७०७६/८८८८८३०१३९), शैलजा मुळ्ये (९८२०६४६११५), शेख अहमद अ.रज्जाक (९९६७३२९३७०),  स्नेहा चव्हाण (८३६९०१५०१३) आणि उज्ज्वला झरे (९९२०१२५८२७) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एफ.जी.नाईक महाविद्यालयात सावित्री जिजाऊ सप्ताह मोठ्‌या उत्साहात संपन्न