डी.वाय.पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

ऑल इंडिया ‘डी.वाय.पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

नवी मुंबई ः नेरुळ मधील ‘डी.वाय.पाटील क्रीडा संकुल'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ वी ऑल इंडिया ‘डी.वाय.पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा' सुरु झाली आहे. २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्‌घाटन १४ फेब्रुवारी रोजी ‘डी.वाय.पाटील क्रीडा संकुल'चे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


‘डी.वाय.पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा'मध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार असून नेहमीप्रमाणे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द गाजवलेल्या नामांकित भारतीय खेळाडुंचा यामध्ये सहभाग असणार आहे. शिवाय अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी सुध्दा सदर स्पर्धा एक सुवर्णसंधी  ठरणार आहे. या स्पर्धेत डी. वाय. पाटील-ए आणि डी.वाय.पाटील-बी यांच्यासह इंडियन ऑईल, टाटा, आरबीआय, इन्कम टॅक्स, रिलायन्स वन, इंडियन नेव्ही, एअर इंडिया, बीपीसीएल, मुंबई कस्टम्स, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सीएजी, जैन इरीगेशन आणि सेंट्रल रेल्वे अशा नामांकित संघांचा सहभाग राहणार आहे.

‘डी.वाय.पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा'मधील सामने डी. वाय. पाटील विद्यापीठ ग्राऊंड आणि डी. वाय. पाटील स्टेडीयम येथे प्रामुख्याने खेळवले जाणार आहेत. २३ फेब्रुवारी या रोजी उपांत्यपूर्व फेरीचे सामने आणि २५ फेब्रुवारी रोजी उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना डी. वाय. पाटील स्टेडीयम येथे खेळवले जाणार आहेत.

मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमींना पर्वणीठरणाऱ्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेवेळी सर्व क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहून क्रिकेट सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

मुंबई विद्यापीठ महिला क्रिकेट संघात नवी मुंबईकर पूर्वा केंडेची निवड