मोदींच्या अदानी लाचारीची हद्द

मोदींच्या अदानी लाचारीची हद्द

लोकांना आता अदानी आणि मोदींच्या संबंधांच्या गाथा कळून चुकल्यात. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून ज्या कारणाने अधिवेशन दररोज रोखलं जातं त्या अदानींच्या साम्राज्याची चिरफाड होत असताना पंतप्रधान मोदी एका शब्दात खुलासा करत नाहीत, याचा अर्थपूर्ण संबंध कोणी लावला तर कोणाला दोष देता येणार नाही.

गौतम अदानींच्या संपत्तीचा मामला आता प्रत्येकाचं घर घेरणारा ठरू लागला आहे. मी बुडेन पण तुम्हाला घेऊनच, या तयारीने अदानींच्या साम्राज्याला हादरे बसू लागले आहेत. जितक्या जलद वर जावं तितक्याच जलद गतीने खाली येण्याची क्रिया ही नैसर्गिक आहे. म्हणूनच आशियात श्रीमंती गाठण्यासाठी धिरुभाई अंबानींना ६० वर्षांचा काळ कामी घालावा लागला. २०१४ मध्ये ज्या व्यक्तीची श्रीमंती जगात १२० क्रमांकावर होती ती मोदी सत्तेच्या आठ वर्षात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचत असेल तर संशयाला जागा होणारच. अदानींच्या या श्रीमंतीचं राज काय, असा प्रश्न कोणी विचारला आणि पंतप्रधान तोंडाचा चंबू करून भाषणं देत बसले आणि नेहरू-गांधी घराण्यावर बोटं मोडत राहिले तर संशय अधिकच बळावतो. अशावेळी पाठीराख्यांच्या आरोळ्या कायम साथ देतील असं नाही.  खोटेपणामुळे अदानींना बसत असलेल्या हादऱ्यांचा एकट्या भाजपला फटका बसला असता तरी कोणाला त्याचं काही वाटलं नसतं. भाजपच्या खासदारांनी तर आपलं इमानही विकल्याने यावर बोलण्याचा अधिकारच त्यांना राहिलेला नाही. पण ज्या सामान्य माणसाने सुरक्षेसाठी स्टेट बँकेत पुंजी टाकलीय, ज्यांनी आपल्या जिविताच्या संरक्षणासाठी एलआयसीत साठवणूक केलीय त्याच रक्कमेची वासलात मोदींच्या सरकारने अदानींसाठी लावल्याने देशातल्या प्रत्येक व्यक्तीला घोर लागलाय. अदानींचे शेअर विकत घ्ोतलेले काय ते पाहतील, असेही काहींना वाटत असेल. पण आता हे सगळं डोक्यावरून गेलंय. अदानी बुडतीलच, भाजप राजकीयदृष्ट्या बुडेल. केवळ त्यांच्या पुरतं हे मय्राादित असतं तरीही दुर्लक्ष करता आलं असतं. पण सामान्यंाचं काय? या करताच मोदींच्या स्पष्टीकरणाची प्रत्येक भारतीयाला अपेक्षा होती. रात्रीच्या खाण्याची भ्रांत ठेवून गाढव दिवसभर ओझं वाहतं तसं भाजपचे खासदारांचं आणि मोदी भक्तांचं सध्या सुरू आहे. ही माणसं अब्जावधीचा भ्रष्टाचार होऊनही खोटारडेपणाचे आणि लुटमारीचे ओझे वाहत मोदींचा उदो उदो करत आहेत. मोदी सरकारच्या अदानी लाचारीचा हा फटका आहे. तो सहजासहजी संपणार नाही. देश बुडवून तो रसातळाला जाईल तेव्हाच या माणसांचे डोळे उघडतील.

देश चालवताना सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, असं तत्व आहे. तसं व्यवसाय करताना एका उद्योगाकडे त्याचं केंद्रीकरण होऊ नये, याची दक्षता घ्ोतली जायची. यामुळेच देशातल्या खासगी उद्योगांनी आपल्या उद्योगासाठी वेगवेगळी क्षेत्रं निवडली. त्यात उद्योगांची वाढही झाली आणि क्षेत्र विस्तारलं. त्यांनी इतर उद्योगांवर कब्जा केला नाही. ज्यावर वकूब आहे तेच क्षेत्र घ्ोऊन उद्योगांनी आपल्या उद्योगाला वर नेलं. याला अपवाद अदानी ठरले. सरकारने करायची कामं मोदींनी अदानींच्या गळ्यात घातली आणि देश ही कमिशनवर चालणारी संस्था करून टाकली. एकाच्याच गळ्यात सारे उद्योग गेले आणि तोच भिकारी बनला तर देशाचं काय होणार, हा साधा प्रश्न मोदींना आणि त्यांच्या सरकारला पडला नाही. तोच प्रश्न आता भारतातील जनता विचारत आहे. याचं उत्तर देण्याची हिंमत भाजपच्या एकाही कार्यकर्ता आणि नेत्यात नाही.

मोदींच्या सरकारने देशातील फायद्याचे सगळेच उद्योग अदानींना दिले आहेत. साम्राज्य हादरलं तर हे सगळे उद्योग चालवणं अदानींना अवघडच नाही..तर अशक्य ठरेल. आधीच जग मंदीच्या छायेत आहे. येत्या वर्षभरात येऊ घातलेल्या संभाव्य मंदीतून बाहेर पडण्यासाठी आतापासूनच प्रत्येक देश धडपडत आहे आणि आपण मंदीत गुरफटून जाण्यासारखे निर्णय घ्ोऊन स्वतःला कफल्लक बनवत आहोत, याची जाण मोदी सरकारला नाही. अदानींचा सर्वात मोठा ब्रॅण्ड असलेल्या फॉर्च्यून या तेल उद्योगाने देशभरचं मार्केट काबीज केलं आहे. एकूण तेलाच्या १६ टक्के इतक्या खाद्य तेलाचा वाटा एकट्या अदानींच्या विलमर या ब्रॅण्ड म्हणजे फॉर्च्यून खाद्य तेलाचा आहे. याच ब्रॅण्डच्या नावाने तांदळापासून, गव्हाच्या पिठापर्यंत गृहिणींना लागणाऱ्या बहुतांश वस्तू बाजारात आहेत. किराणाचा पुरवठा करणारा विलमर हा चवथ्या क्रमांकाचा ब्रॅण्ड मानला जातो. अदानी बुडाले तर देशातील किराणा मालाचे भाव वाढणं स्वाभाविक आहे. अदानींच्या उद्योगाचं सर्वात मोठं क्षेत्र हे वीज उत्पादनात सामावलं आहे. ग्रीन ऊर्जा स्त्रोच्या माध्यमातून अदानींनी देशाला पिंजून काढलंय. या उद्योगासाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा केंद्राच्या मदतीने आपल्याकडे घ्ोण्यात अदानी यशस्वी झालेत. याच कोळशासाठी मोदींनी अदानींना सोबत घ्ोऊन ऑस्ट्रेलियापुढे मिनतवारी केली होती. या कोळशाच्या उत्पादनावर देशातील वीज प्रकल्प ताब्यात घ्यायचे आणि देशांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना हा कोळसा सक्तीने विकत घ्यायला लावायचा फंडा सुरू झाला. आता तर श्रीलंकेला वीज पुरवठा करण्यासाठी छत्तीसगडमध्ये प्रकल्प उभारण्याचा अदानींचा प्रयत्न सुरू आहे. अदानी हे कोळशाचं उत्पादन घ्ोणारे देशातले पहिल्या क्रमांकाचे उद्योजक ठरले आहेत. हे झालं वीज उत्पादनाचं. हेच उत्पादन ग्राहकांच्या घरोघर पोहोचवण्यासाठी अदानींची पुढची मोहिम सुरू आहे. इतर राज्ये लाचार झाल्यानंतर महाराष्ट्रानेही अदानींपुढे नांगी टाकली आणि वितरणही त्या उद्योगाला देण्याचा विषय चर्चेला आला. याला विरोध म्हणून सारं राज्य महिनाभरापूर्वी अंधारात जाण्याची वेळ येऊन ठेपली. वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाक दाबल्यावर शिंदे-फडणवीस सरकार नमलं.

‘अदानी टोटल या उद्योगातून देशातील तेल आणि वायू उत्पादनात अदानींनी पाऊल टाकलं. ओएनजीसीकडून आजवर भारतासाठी आवश्यकतेपैकी ३५ टक्के इतक्या तेलाचं उत्पादन केलं जायचं. आता ओएनजीसीचा हा मक्ता रिलायन्स आणि अदानींना वाटून बहाल करण्याची तयारी मोदींच्या सरकारची सुरू आहे. तेल आणि वायू उत्पादनाचा हा उद्योग सर्वात फायद्याचा असूनही त्याचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज अदानी ही या क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. पाईपलाईनद्वारे सीएनजी घराघरात पोहोचवण्याचं सर्वात मोठं जाळं हे अदानींच्या नावावर आहे. हवाई क्षेत्रातील विमानसेवेत अदानींनी उडी घेतल्यानंतर फायद्यातील विमानतळं त्या उद्योगाला देण्यात आली आहेत. विमान प्राधिकरणाकडे असलेली सातपैकी अशी सहा विमानतळं अदानींच्या ताब्यात आहेत. १६ हजार ७०० कोटींच्या खर्चाच्या नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अदानींकडे केव्हाच गेली.  विमानतळांच्या क्षेत्रात जीव्हीके कंपनी माहीर समजली जायची. या कंपनीकडून विमानतळांचा गल्ला अदानींकडे यावा यासाठी जीव्हीकेच्या कार्यालयांवर तिथल्या बड्या अधिकाऱ्यांच्या घरांवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरू झाली. नको त्या संकटाला तोंड देण्यापेक्षा निमुटपणे या विमानतळांवर जीव्हीकेने पाणी सोडलं.

सिमेंट उद्योगाचंही तसंच. भारतात सव्रााधिक उत्पादन घेणाऱ्या एसीसी आणि अंबुजा या दोन्ही उद्योगांचं हस्तांतरण अदानींकडे गेलं आहे. देशातील एकूण बांधकाम क्षेत्रातील ९० टक्के वाटा या दोन सिमेंट उद्योगांकडे आहे. तो आज अदानींकडे आल्याने केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही. यातच रिअल इस्टेटमध्येही अदानींनी स्वतःची जागा बनवलीय. सिमेंट उद्योगाचा फायदा इथे मिळेल आणि सरकारी रस्ते आणि इमारती उभारणीतही फायदा करून घ्ोता येईल, हे अदानींनी ताडलंय. रस्ते उभारून टोलद्वारे चांगली कमाई करता येते, हे गुजराती असलेल्या अदानींना कोणी सांगायची आवश्यकता नाही. डौलाने जनसेवा करणाऱ्या रेल्वेत अदानी घुसले आणि भारत सरकार त्यांना पावलं. पाच हजार किलोमीटर लांबीचे देशातील १३ प्रकल्प सध्या अदानींकडून उभारले जात आहेत. त्यासाठी ४१ हजार कोटी रुपये खर्ची घातले जात आहेत. टोलच्या उत्पादनात अदानींच्या कमाईचा मोठा वाटा असू शकतो. देशातील फायद्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणजे बंदरं. देशातील सर्वात मोठं असलेल्या मुंद्रा बंदर हे अदानींच्या मालकीचं आहे. या बंदराच्या जोरावर इतरही बंदरं ताब्यात घ्ोण्याच्या तयारीत अदानी आहेत. देशातील १५ सरकारी बंदरं याअधीच अदानींच्या कब्जात गेलीत. बंदरातील एकूण व्यपारातील २५ टक्के हिस्सा एकट्या अदानींच्या बंदरांच्या नावावर आहे. असे सगळेच उद्योग आज अदानींच्या नावावर असताना अदानी बुडाले तर या उद्योगांचं काय होणार या प्रश्नाने देशाची झोप उडाली आहे. मात्र देशाचं काय होईल याची फिकीर भाजपच्या नेत्यांना नाही, हेच चित्र गेल्या काही दिवसांपासूनचं आहे. यावर कहर केला तो पंतप्रधान मोदींच्या संसदेतील बेजार भाषणाने... 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी