सुयोग स्मृती चषक २०२३  या चषकावर साईनाथ दिवा संघाने कोरले नाव

साईनाथ दिवा संघ ठरला सुयोग स्मृती चषकाचा मानकरी

नवी मुंबई -: नवी मुंबईतील जुहुगाव येथे आयोजित सुयोग स्मृती चषक २०२३ या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेत जय गजानन कुकशेत या संघावर मात करून साईनाथ दिवा संघाने सुयोग स्मृती चषक २०२३  या चषकावर आपले नाव कोरले आहे. 

भारतीय जनता पार्टीच्या बोनकोडे मंडळ अध्यक्षा शीतल ताई.भोईर यांच्या माध्यमातुन आपला भाऊ सुयोग भोईर याच्या स्मृती प्रीत्यर्थ गावदेवी मैदान जुहूगाव येथे मागील १३  वर्षापासून सुयोग स्मृती चषक दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धेचे १४ वे वर्ष होते. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली होती व स्पर्धेचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले होते. ३ तारखेला अंतिम सामन्यात जय गजानन कुकशेत संघावर साईनाथ दिवा या संघाने मात करत सुयोग स्मृती चषक २०२३  या चषकावर आपले नाव कोरले . तर तृतीय क्रमांकावर जी आर तुर्भे संघाला समाधान मानावे लागले. दोन लाख रु रोख प्रथम क्रमांक व एक लाख द्वितीय तसेच  पन्नास हजार व आकर्षक चषकअसे बक्षिसाचे स्वरूप होते. स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल ओमी केनी यास सामनावीर म्हणून किताब देण्यात आला. सुयोग स्मृती चषक ही नवी मुंबईतील  एक अतिशय नावाजलेली स्पर्धा असल्याने या स्पर्धेला नवी मुंबई भाजप प्रभारी संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक राहुल भाई पाटील, उद्योजक साग  उतावले, नीलेश पाटील, युवा नेते निशांत भगत यांसह रायगड, नवी मुंबईतील असंख्य लोकप्रतिनिधींनी भेट दिली.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

डी.वाय.पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेला सुरुवात